कोल्हापुरात पुन्हा 'आमचं ठरलंय' ; पाटील-महाडिक समर्थक सोशल मीडियावर भिडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political

पाटील विरुध्‍द महाडिक असा सामना असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

कोल्हापुरात पुन्हा 'आमचं ठरलंय'ची सोशल मीडियावर चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्‍हा एकदा पालकमंत्री सतेज पाटील व महादेवराव महाडिक आमनेसामने आले आहेत. महाविकास आघाडीकडून मंत्री पाटील व भाजपकडून महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल रिंगणात उतरले आहेत. पाटील विरुध्‍द महाडिक असा सामना असल्याने चुरस निर्माण झाली आहे. जाहीर प्रचार, टिकाटिप्‍पणी, सभा नसल्या तरी सोशल मीडियावर मात्र दोन्‍ही गटांचे कार्यकर्ते भिडल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार महाडिक समर्थकांनी केला आहे, तर ‘आमचं ठरलंय विधान परिषद उरलंय’ या ट्रेंडच्या माध्यमातून मंत्री पाटील यांचे कार्यकर्ते विजयाचा दावा करत आहेत.

नेतेमंडळी, वैयक्तिक मतदारांना भेटून आपली बाजू भक्‍कम करत आहेत. नेते जरी शांत असले तरी दोन्‍ही गटांचे कार्यकर्ते मात्र अस्‍वस्‍थ आहेत. सभा, प्रचारातून आरोप, प्रत्यारोपाची संधी नसल्याने त्यांनी या कामासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम कार्यकर्ते करत आहेत.

हेही वाचा: दोन वर्षानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद दिसणार नाही - नायब राज्यपाल

महाडिक गटाचे कार्यकर्ते २०१४ च्या निवडणुकीचा संदर्भ देत २० ते २२ दिवसांत पाटील यांच्या विरोधात मैदान मारल्याचा दाखला देत आहेत. तसेच ‘अमल जनतेचा, भावी आमदार,’ ‘२०१४ च्या इतिहासाची पुनरावृत्ती,’ ‘पुन्‍हा कमळ,’ ‘विधान परिषदेत अमल,’ ‘भावी आमदार,’ ‘२०१४ रिट‍न्‍स,’ ‘मिशन विधान परिषद,’ ‘अं हं महाडिकच,’.‘मिशन सुटटी नॉट, फक्‍त औपचारिकता बाकी विजय निश्‍चित अशा पध्‍दतीच्या पोस्‍टव्दारे वातावरण तापवण्याचा प्रयत्‍न करत आहेत.

मंत्री पाटील गटाचे कार्यकर्तेही जशास तसे उत्तर देताना दिसत आहेत. पाटील गटाचा ‘आमचं ठरलंय हा ट्रेण्‍ड, तर राज्यात प्रसिध्‍द झाला आहे. त्याचा संदर्भ घेत आमचं ठरलंय’ विधान परिषद उरलंय, असा ट्रेण्‍ड चालवला जात आहे. ‘अं हं पाटीलच,’ ‘एकच साहेब बंटी साहेब,’ ‘पक्षनिष्‍ठा म्‍हणजे बंटी पाटील’ अशा पोस्‍ट, स्‍टेटस्‌व्दारे विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण केली जात आहे.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

loading image
go to top