अकोला : ई-चालान वाहनधारकांवर दाखल होणार खटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cases will filed against e challan vehicle owners akola

अकोला : ई-चालान वाहनधारकांवर दाखल होणार खटले

अकोला : ई-चालान दंड प्रलंबित असणाऱ्या वाहनधारकांनी १२ मार्च २०२२ रोजी जिल्हा सत्र न्यायालय येथे आयोजित लोकअदालतमध्ये हजर राहून त्यांचे प्रलंबित ई-चालान दंडाचा भरणा करावा किंवा ११ मार्चपूर्वी प्राप्त लिंकद्वारे अथवा महाट्रॅफीक ॲपद्वारे भरणा करावा. अन्यथा संबंधित ई-चालान दंड प्रलंबित असणाऱ्या वाहनधारकांवर खटले दाखल करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी कळविले आहे.

शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत १ जानेवारी २०२१ ते आज पावेतो एकूण एक लाख ७० हजार ४७८ वाहनचालक/धारकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचेकडून एक कोटी २३ लाख ७८ हजार ६५० रुपये दंड वसूल करून शासन जमा करण्यात आला आहे. परंतु १ जानेवारी २०२१ ते आज पावेतो एकूण ई-चालान करण्यात आलेल्यांपैकी १ लाख १८ हजार ७६ वाहन धारकांवर एकूण ३ कोटी ६१ लाख ४९ हजार २५१ रुपये ई-चालान तडजोड रक्कम थकबाकी आहे.

अशा प्रकारचे ई-चालान दंड प्रलंबित असणाऱ्या वाहनधारकांनी १२ मार्च २०२२ रोजी जिल्हा सत्र न्यायालय येथे आयोजित लोकअदालतमध्ये हजर राहून त्यांचे प्रलंबित ई-चालान दंडाचा भरणा करावा अथवा ११ मार्च २०२२ पूर्वी कोणत्याही ट्रॅफीक अमंलदाराकडे सदर दंडाचा भरणा करण्याबाबत वाहनधारकांच्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस. पाठवून सूचना देण्यात आलेली आहे. सदर दंडाचा भरणा हा वाहनधारकांना आलेल्या एस.एम.एस.वरील लिंकद्वारे अथवा महाट्रॅफीक ॲपद्वारे सुद्धा भरता येतो. त्यानुसार शहरातील सर्व नागरिकांनी त्यांच्या वाहनावरील प्रलंबित ई-चालान तडजोड रक्कम शासन जमा करावी अन्यथा संबंधित वाहनचालकांविरुद्ध विद्यमान न्यायालयात खटले भरण्यात येणार असल्याचे अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: Cases Will Filed Against E Challan Vehicle Owners Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top