वृक्षाला राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

national flag

राष्ट्रध्वजाला राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे

वाशीम - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे व राष्ट्रीय एकात्मतेची महत्त्व पटवून सांगत भारतीय राष्ट्रध्वजाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे एम एन वानखडे सर यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थी वरद महाकाळ ईशांत राजगुरे आयुष काळे यांनी आपल्या भाषणातून रक्षाबंधनाचा इतिहास व वृक्षांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले तर रोहित वदे व रोहन लोखंडे या विद्यार्थ्यांनी आपल्या गीतातून राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रीय एकात्मता विषयी महत्व व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेचे प्राचार्य श्री एम एस भोयर यांनी वृक्षाचे महत्व विशद करताना सांगितले की," राष्ट्रीय ध्वज हा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाला जेव्हा आपण ही राखी बांधली म्हणजे आपण जणू राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली आहे. प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या सुखी आयुष्यासाठी एक वृक्ष लावावे, तर भावाने सुद्धा बहिणीचे रक्षण करण्याचे वचन दे एका वृक्षाची लागवड करावी म्हणजे हे नाते अनमोल बनेल.

यावेळी मंचावर शाळेचे प्राचार्य श्री एम एस भोयर, कमांडंट कर्नल पी.पी.ठाकरे, श्री एस. बी. चव्हाण, श्री एस एस मोळके, कू. व्ही एस वाजपेयी तर विद्यार्थ्यांचे पालक प्रतिनिधी म्हणून श्री विष्णूजी डोईफोडे, श्री रघुनाथ पडवाळ, सौ.शोभा आंबेरे, सौ. सीमा तराळे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ९ वा अ मधील विद्यार्थी चेतन पाटील,प्रज्वल इंगळे तर आभार संस्कार सांगळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रशिक्षण निदेशक बी.डी सोनटक्के, श्री ए आर खांदवे, निसर्ग मंडळाचे प्रमुख श्री पी ए पाचकोर,एन के भेंडे, व्ही व्ही सिसट श्री एस बी पांडे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Celebrate Unique Rakshabandhan Tying Rakhi To National Flag

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..