
तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे गाव आता आपली वेगळी ओळख करण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे.
दानापूर येथील स्मशानभूमी बनली पर्यटन स्थळ, 75 वर्षावरील वयोवृद्धांनी घडवली क्रांती
दानापूर (जि.अकोला) : स्मशानभूमी म्हटली की लोकांच्या समोर येतो तो शेवटचा क्षण अंत्ययात्रा व त्या अंत्ययात्रेत समाविष्ट झालेले लोक हे असं एकंदरीत चित्र, पडीक स्मशानभूमीचे शेड, आजूबाजूला शांतता मात्र दानापूर येथील स्मशानभूमी या सर्व गोष्टीला अपवाद ठरत आहे.
बहिणीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्याला अटक करा अशी भावाची मागणी; तपासाबाबत हिवरखेड पोलिस उदासीन
तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे गाव आता आपली वेगळी ओळख करण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे. या गावाची ख्याती आजही पंचक्रोशीत ओळखली जाते. येथील उत्तरेकडील गरुड धाम (समशान भूमी आपल्या नावाचा डंका पंचक्रीशीत गाजवत आहे. सगळ्या सुविधांनी नटलेली स्मशानभूमी (गरुड धाम) आज दानापूरसह परिसरातील लोकांची पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जात आहे.
रिटायर्ड लोकांनी घडवली स्मशानभूमी
विविध क्षेत्रातील मित्र एका ठिकाणी येऊन पर्यटन स्थळ तयार केले. कोणी शिक्षक, लिपिक, पोस्टमन, चपराशी, महाराज, तर कोणी शेतकरी अशा विविध मित्रांनी एकत्र येऊन कधीही मेहनतीचं काम न केलेल्या मित्रांनी हातात कुऱ्हाड विला, फावड घेऊन, श्रमदान करून जे जमेल ते काम व गावकऱ्यांच्या सहकार्यातून या गरुड धाम (स्मशानभूमीचं) रुपडं बदलून टाकलं. आज हे गरुड धाम लोकांचं पर्यटन स्थळ बनलं आहे.
साडीतीन एकरात वसलेल गरुड धाम (स्मशानभूमी)
उत्तरे कडील गरुड धाम हे साडेतीन एकराच्या परिसरात वसलेले आहे. त्यामुळे येथे श्रमदानातून मोठया प्रमाणावर काम करण्यात आले आहे.
विविध झाडाची लागवड.
या गरूड धाम (स्मशानभूमी) मध्ये कडू लिंब, पिंपळ, वड, बांबू अशा विविध प्रकारच्या जातीचे 290 झाडे लावण्यात आली आहेत. सोबतच फुलांची अतिशय मोहक झाडे दुतर्फा लावण्यात आले आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना बसण्याची अद्यावत सुविधा, स्टेडीयम बांधण्यात आले आहे. त्याच बरोबर शिवजीची मोठी महाकाय मूर्तीची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे.
येथे करतात विदयार्थी अभ्यास
कोरोनामुळे आता सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी निसर्ग रम्य वातावरणात अभ्यास करण्यासाठी येतात.
लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
तेल्हारा तालुक्यातील काही गावात आजही स्मशानभूमी नाही. प्रेत शेतात जाळवी लागतात. मात्र याकडे दुर्लक्ष तर आहेच मात्र ज्या ठिकाणी लोकांनी श्रमदानातून स्मशानभूमीचे रूपांतर आज पर्यटन स्थळ म्हणून केलं. तिथंही सहकार्य तर दूरच मात्र साधी एक भेट पण दिली नसल्याने जनतेत नाराजीचा सूर आहे.
स्वच्छतेचा दिला जातो संदेश
या गरुड धाममध्ये अंत्यविधी करिता आलेल्या लोकांना स्वच्छता राखावी या करिता सूचना फलक व कचरा कुंडी यांचा उपयोग करावा असे सांगण्यात आले आहे.
आम्ही विविध क्षेत्रातील रिटायर्ड मित्रांनी एकत्र येऊन ही संकल्पना मांडली. ती सगळ्यांना आवडली आहे. या गरुड धाममध्ये या अगोदर काहीच व्यवस्था नव्हती. मात्र, आज हे लोकांचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे. हे सर्व गावकऱ्याच्या व सहकार्यातून शक्य झालं.
- विश्वासराव विखे, गरुड धाम -अध्यक्ष, दानापूर
Web Title: Cemetery Danapur Has Become Tourist Destination
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..