मृत्यूचे शतक

भगवान वानखेडे 
Sunday, 19 July 2020

एका आत्महत्येसह 101 कोरोना बळी ः रुग्णसंख्या 2065

अकोला ः रुग्णसंख्येचे शतक गाठल्यानंतर चिंताक्रांत होणाऱ्या अकोल्यात आता कोरोना बळींची संख्या शंभरीपार गेली आहे. एका आत्महत्येसह 101 कोरोना बळी झालेल्या अकोला वऱ्हाडातच नव्हे तर विदर्भात सर्वाधिक मृत्यू झालेला जिल्हा म्हणून कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरला आहे. 

7 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर शंभर दिवसांत अकोल्यात एका आत्महत्येसह 101 कोरोना बळी गेले आहेत. या आकडेवारीचा विचार करता मागील शंभर दिवसांत अकोल्यात दिवसाला एक कोरोना बळी गेल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे हा मृत्यूदर राज्याच्या मृत्यूदरापेक्षा अधिक असून, अकोलेकरांना आता पुन्हा सतर्क व्हावे लागणार आहे.  शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे पुरुष असून त्यातील एक 76वर्षीय तर अन्य 54वर्षीय आहे. हे दोघे जण अकोट येथील रहिवासी आहेत. ते १० जुलै रोजी दाखलझाले होते. त्यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

दिवसभरात आठ रुग्णांची भर
शनिवारी सकाळी  चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे चारही जण पुरुष असून त्यातील तीन जण बोरगाव मंजू येथील तर अन्य एक जण अकोली जहागिर (ता अकोट)येथील रहिवासी आहेत.काल रात्री रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये पॉझिटीव्ह आलेल्या अहवालांची संख्या आतापर्यंत 98झाली आहे.त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष असून त्यातील तीन जण बोरगावमंजू येथील तर अन्य एक जण ते सर्व मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.

15 जणांना डिस्चार्ज
दुपारनंतर कोविड केअर सेंटर मधून 10 आयकॉन हॉस्पिटलमधून तीन व हॉटेल रिजेन्सी मधून दोन अशा 15जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना अपडेट
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- 2065
मृत्यू-100
आत्महत्या-1
 डिस्चार्ज- 1682
दाखल रुग्ण -282
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Century of Death