esakal | बापरे! हवामान विभाग म्हणतो, आज मुसळधार पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Chance of torrential rain today, says Akola News Meteorological Department

अकोला जिल्ह्यासह विदर्भातील काही भागांत आज मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

बापरे! हवामान विभाग म्हणतो, आज मुसळधार पावसाची शक्यता

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : अकोला जिल्ह्यासह विदर्भातील काही भागांत आज मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्या राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर होता. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

अकोला जिल्ह्यीतील बातम्यांसाठी क्लिक करा

सध्या या भागातील पावसाचा जोर ओसरला असला, तरी काही ठिकाणी हलक्या सरी कायम आहेत. मुख्यत: कोकणात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या सरी कायम राहणार आहेत.

मध्य महाराष्ट्राच्या घाटक्षेत्रातही हलका पाऊस पडणार आहे. ऑगस्टमध्ये विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. याच भागातील दोन ते तीन जिल्हे अद्यापही पवसाची सरासरी पूर्ण करू शकले नाहीत. या भागांत दोन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

पूवरेत्तर भागांमधील राज्यात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला अनुकूल स्थिती आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २७ ऑगस्टला विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

काही ठिकाणी मेघगर्जनाही होईल. १८ ऑगस्टलाही विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर कोकणात काही ठिकाणी मुसळधारांची शक्यता आहे.