
सिंदखेड राजा (बुलढाणा) : जिल्ह्यातील लोणार हे 'अ' अव्वल दर्जाचे पर्यटनस्थळ असून येथील पर्यटनासह विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोणार येथे आले होते. दरम्यान मातृतिर्थ सिंदखेड राजा येथील विकास आराखडा ही तितकाच महत्त्वाचा असून त्याचाही विकास होणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या ताब्यात इंगत काळात मतदार संघ आणि सध्या नगरपालिका असताना विकासाला केवळ बट्ट्याबोळ झाला आहे.
याबाबत 'दैनिक सकाळ' च्या माध्यमातून ५ फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित करण्यात आले. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या प्रकरणी लक्ष वेधीत 'दैनिक सकाळ'च्या वृत्ताचा दाखला दिला. यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलेही प्राधिकरण न स्थापन करत आपण लवकरच मातृतिर्थ सिंदखेड राजाला भेट देऊन थेट मुख्यमंत्री कार्यालयात मातृतीर्थ विकास आराखड्याबाबत कार्यप्रणाली अवलंबणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेले मातृतिर्थ सिंदखेड राजा शहराचा विकास होण्यासाठी शासनाकडून सिंदखेड राजा विकास आराखड्याची नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार 2015 मध्ये तत्कालीन शासनाने शिंदखेडराजा विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली, त्यानुसार स्थानिक नगर परिषदेच्या माध्यमातून 17 मे 2016 जिल्हा नियोजन समितीकडे विविध विकास कामासाठी 76. 32 कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यामध्ये शिंदखेडा शहरासाठी पाणी पुरवठा वितरण व्यवस्था, भुयारी गटार योजना, मोती तलावाचे सुशोभिकरण, चांदणी तलावाचे सुशोभीकरण, जिजाऊ विकास आराखडा अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामे या प्रमुख कामाचा समावेश होता. परंतु अनेक वर्षे उलटून स्थानिक नगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शिंदखेडच्या विकास आराखड्याचे काम हे फक्त लालफितीत अडकल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे नगरपालिका व प्रशासन करते तरी काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला होता.
मातृतीर्थ सिंदखेडराजा आराखड्यातील समाविष्ट बाबीचा विकासात आणि इतर प्रकल्प अहवाल कार्य हे एकाच विभागाकडे नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सातत्याने होणारी दिरंगाई आणि निधी अभावी होणारा विलंब पाहता विकास आराखडा रेंगाळत पडला आहे. लोणारच्या धरतीवर मातृतीर्थ सिंदखेडराजा इथे विकास करायचा आहे. त्यासाठी नियोजित आराखड्यावर मुंबईत बैठका होतील.
या विकासाबाबत प्रश्न समजावून घेऊन त्यावरचे उपाय निश्चित करुन मगच प्रत्यक्ष सिंदखेड राजाला भेट देण्यासाठी आपण येऊ. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. विकास आराखड्याबाबत होत असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सूचना करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिगणे यांनी दैनिक सकाळच्या वृत्ताचा दाखला देत केली.
यावर मुख्यमंत्र्यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा आराखडा हा लोणार आराखडा तितकाच महत्त्वाचा आहे. यासंदर्भात लवकरच प्रत्यक्षरित्या मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे भेट देऊन विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या प्रत्येक ठिकाणी भेट दिली. त्यानंतर झालेल्या कामाचा आढावा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या आराखड्यानुसार थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या विकास आराखड्यातील कामाची अंमलबजावणी करण्यात येईल. विशेष म्हणजे याबाबत दर महिन्याला कामाचा आढावाही संबंधित यंत्रणेकडून घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सकळा, ई-सकाळ व सरकारनामा वृत्ताची चर्चा
मातृतिर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्याकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधून त्यांना नवचेतना सह विकास आराखड्यातील कामे जलद गतीने करण्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे संपूर्ण एक दिवस आढावा घेणार असल्याचे सांगितले. यावरून उपस्थितांमध्ये सकाळ, ई-सकाळ व सरकरनामाच्या वृत्तपत्राची चर्चा ऐकायला मिळत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.