चिखली : आशा वर्करला ९५ हजाराने गंडविले

आशा वर्करला ९५ हजाराने गंडविले
aasha
aashasakal
Updated on

चिखली : तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील आशा वर्करला तब्बल ९५ हजार ८२९ रुपयांनी गंडविण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चिखली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकरणी तपास सायबर सेल बुलडाणा यांच्याकडे देण्यात आला आहे.

सावरगाव डुकरे येथील सविता गजानन डुकरे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांनी पती गजाननसह पोलिस स्टेशन गाठले. आशा वर्कर म्हणून काम करत असताना मानधन म्हणून प्राप्त होणारी रक्कम त्यांनी एसबीआय चिखली शाखेत ठेवली होती. खात्याचे एटीएम कार्डसुद्धा त्यांच्याकडे आहे. त्या एटीएम कार्डचा पीन क्रमांक त्यांनी कुणालाही सांगितलेला नाही. १६ सप्टेंबरला पती गजानन डुकरे यांना पैशांची आवश्यकता असल्याने ते एटीएम कार्ड घेऊन शिवाजी शाळेजवळील एटीमएमध्ये गेले.

aasha
पैठण : ट्रक, आयशर अपघातात एक जण ठार

तिथून त्यांनी दोन हजार रुपये काढले. त्यानंतर २६ ऑक्टोबरला त्यांनी मोबाइलमधील मेसेज तपासले असता बँक खात्यातून कुणीतरी परस्पर रक्कम काढून घेत ९५ हजार ८२९ रुपये काढल्याचे समोर आले. एटीएमसुध्दा त्यांच्याकडेच होते. त्यांचा पीन क्रमांकही कोणाला सांगितला नाही. तरीही पैसे गायब झाल्याने त्या चक्रावल्या असून, याप्रकरणी पोलिसांनी तपास करून पैसे मिळवून द्यावेत अशी तक्रार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Indian Community Seeks Protection for 40-Year-Old Shri Ram Temple in Peterborough
accused arrested in duplicate note case
Akola Crime News
Akola Cyber Crime
Marathi News Esakal
www.esakal.com