Akola Crime News
esakal
चिखली: तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे पाच नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका (Chikhli Case) हादरला आहे. स्वतःच्या आई-वडिलांचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करून मुलाने आत्महत्या केली. सुभाष डिगंबर डुकरे (७५), त्यांची पत्नी लता डुकरे (६५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (४२) यांचा मृतांत समावेश आहे.