
नांदुरा : घरावर लोंबकळत असलेल्या तारेचा स्पर्श होऊन ९ वर्षीय चिमुकला भाजल्या गेला. दरम्यान महावितरणाच्या निष्क्रियतेमुळे आज त्या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ता. ७ जूनच्या सकाळी भीमनगर येथील अमित संतोष तायडे हा मुलगा सकाळी आपल्या घराच्या छतावर खेळत असताना घरावरून गेलेल्या विद्युत प्रवाह असलेल्या ताराला स्पर्श होऊन त्याला जोरदार शॉक लागला.