esakal | मुलाने केली पित्याची हत्या ; चिंचखेड खुर्द येथील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

In Chinchkhed, a boy has killed his father by beating him severely

नेहमी नेहमी होणार्‍या वाद व मारहाणीमुळे राग अनावर झाल्याने जन्मदात्या बापाच्या डोक्यात व चेहर्‍यावर काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी करून मृत्यूला कारणीभूत ठरला. 

मुलाने केली पित्याची हत्या ; चिंचखेड खुर्द येथील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगाव बढे (बुलडाणा ) : स्थानिक पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या चिंचखेड ता. बोदवड जि.जळगाव येथील शेत शिवारात मुलाने जन्मदात्या बापाची गंभीर मारहाण करत हत्या केल्याची घटना (ता.18) डिसेंबरला उघडकीस आली.

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलिस स्टेशन अंतर्गत चिंचखेड (खुर्द ) ता.बोदवड जि.जळगाव येथील मृतक शंकर गरबड लवंगे (वय 72 वर्ष) यास घटनास्थळ धामणगाव बढे पोलिस स्टेशन अंतर्गत शेत शिवारात 17 डिसेंबरला रात्री 9.30 ते 10 वाजेदरम्यान मृतकाचा मुलगा ज्ञानेश्वर शंकर लवंगे (वय 32 वर्ष, रा.चिंचखेड (खुर्द ) ता.बोदवड (जि. जळगाव) यास मृतकाने तू तुझ्या पत्नीला लग्नात भेटल्याने लग्नातून येण्यास उशीर झाल्याने मृतकाने आरोपी सोबत वाद करून शेतातील पर्‍हाटीने मारहाण केली होती. त्यामुळे नेहमी नेहमी होणार्‍या वाद व मारहाणीमुळे राग अनावर झाल्याने जन्मदात्या बापाच्या डोक्यात व चेहर्‍यावर काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी करून मृत्यूला कारणीभूत ठरला. 

हे ही वाचा : करडी परिसरातील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे ; तीस गुंठ्यामध्ये 10 विविध वाणाचा प्रयोग

या घटनेची तक्रार मृतकाचा दुसरा मुलगा किसन शंकर लवंगे (वय 33 वर्ष, रा. चिंचखेड (खुर्द ) ता.बोदवड (जि.जळगाव) याने 18 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजेदरम्यान दिली. यावर एपीआय चंद्रकांत ममताबादे यांचे मार्गदर्शनात दाखल अधिकारी नापोका दिनकर भाकरे, पोउपनि आशिष गंद्रे, पोहेका दीपक दळवी, सूरज रोकडे, नितीन इंगळे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेतील आरोपी (मुलगा) ज्ञानेश्वर लवंगे याला ताब्यात घेतले असता शनिवारी (ता.19) डिसेंबरला आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या घटनेतील आरोपी विरुद्ध धामणगाव बढे पो.स्टे ला खुनाचा गुन्हा दाखल केला असून ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांचे मार्गदर्शनात पोउपनि आशिष गंद्रे पुढील तपास करीत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image