esakal | आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आज होणार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आज होणार सुरू

आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आज होणार सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चांडोळ : संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने शाळा सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता कोरोना मुक्त क्षेत्रातील जिल्हा परिषद, नगरपरिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत सर्व माध्यमांच्या उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद बुलडाणा शिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच प्राथमिक यांनी बुलडाणा तालुक्याचे सर्व गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित शाळेचे सर्व मुख्याध्यापकांना शैक्षणिक सत्र 2021 - 22 मध्ये इयत्ता 8 ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश पारित केले आहे. (Classes from 8th to 12th will start today)

हेही वाचा: ताई तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट

आदेशात ग्रामपंचायत कार्यालयाचा ठराव घेऊन तसेच पालकांची संमती घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांनी नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून वंचित राहावे लागल्याने त्यांना शाळा सुरू होण्याची उत्सुकता लागली होती.शाळेतील मित्र तसेच शाळेतील अभ्यास करण्याची पद्धत.प्रत्येक शिक्षकांची शिकविण्याची पद्धत यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.त्यामुळे आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग 15 जुलै पासून सुरू होणार या निर्णयाने शालेय विद्यार्थ्यांच्या चेहरे आनंदाने खुलले असल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Classes from 8th to 12th will start today

loading image