cm devendra fadnavis
sakal
-योगेश फरपट
अकोला: महाराष्ट्र हे देशातील नागरिकरण झालेल्या राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून ग्रामीण भागासोबतच आता शहरांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आम्ही साकारत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी खेड्यांचा विकास साधला आणि आता शहरी विकासाची नवी वाट उघडली आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून, आवश्यक तेवढा निधी आणि सविस्तर नियोजन आमच्याकडे तयार आहे. येणाऱ्या काळात राज्यातील प्रत्येक शहराचा वेगाने विकास होताना दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.