
बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्वात देशाची चौफेर प्रगती होत असून जगात भारताची मान उंचावत आहे त्यामुळे विचार आणि विकासाच्या लढाईमध्ये महायुतीला साथ द्या असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाण्यात केले.
येथील ओंकार लॉन मध्ये महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, आमदार संजय गायकवाड,
श्वेता ताई महाले, आकाश फुंडकर, डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह माजी आमदार ध्रुपदराव सावळे, ॲड. नाझेर काजी, डॉ. गणेश मान्टे, नरहरी गवई, ओम सिंग राजपूत, विजयराज शिंदे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळातील रखडलेला विकास, बंद पडलेले प्रकल्प, नकारात्मकता या सर्व बाबींचा ऊहापोह केला, आणि आता उबाठा म्हणजे, सिल्वर ओकने म्हटलं की उठायचं अन् काँग्रेसने म्हटलं की बसायचं !
या शब्दात टीका केली. आपल्याकडे नरेंद्र मोदी सरकारच्या काळात केलेल्या विकास कामांची मोठी जंत्री आहे. विरोधकांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपण केलेली विकास कामे व देशाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या मोदी सरकारला भरभक्कम ताकद देण्यासाठी महायुतीचे उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
तत्पूर्वी व्यासपीठावरील खासदार प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री डॉ. संजय कुटे, डॉ. राजेंद्र शिंगणे व इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले. जिल्हाभरातून आलेले हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.