वाशीम जिल्हयात ११८ ग्रामपंचायतीच्‍या क्षेत्रात आचारसंहिता लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीम जिल्हयात ११८ ग्रामपंचायतीच्‍या क्षेत्रात आचारसंहिता लागू
वाशीम जिल्हयात ११८ ग्रामपंचायतीच्‍या क्षेत्रात आचारसंहिता लागू

वाशीम जिल्हयात ११८ ग्रामपंचायतीच्‍या क्षेत्रात आचारसंहिता लागू


वाशीम : जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणाने रिक्त झालेल्या १८९ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १७ नोव्हेंबरपासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजे २७ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा: किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील विद्युत खांबांचा अडथळा अखेर निघणार

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांच्या कार्यक्रमानुसार ३० नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या काळात नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार आहेत. सात डिसेंबरला छाननी केली जाईल. नऊ डिसेंबरला नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. याच दिवशी चिन्हांचे वाटप केले जाईल. २१ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. तर २२ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल.

loading image
go to top