लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांसोबतही धक्काबुक्की
लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांसोबतही धक्काबुक्कीEsakal Photo

लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांसोबतही धक्काबुक्की

नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग

अकोला ः तुटपुंज्या लसी व लस (Vaccine) घेणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बुधवारी (ता.१२) अकोला शहरासह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर (Vaccination Center) गोंधळाचे वातावरण होते. त्यात नागरिक व लसीकरण अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडले. अकोला शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील (Ayurvedic College) लसीकरण केंद्रावर तर पोलिस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. Confusion at the vaccination center; Pushback with the police

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सध्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यात १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन प्रशासनाच्या स्तरावरून नीटपणे होताना दिसत नाही. त्यामुळे सलग आठवडाभरापासून लसीकरणाचा जिल्ह्यात नुस्ता गोंधळ उडत आहे. वेळेवर लसीकरण केंद्र बदलणे, उपलब्ध लसीपेक्षा अधिक नागरिकांना केंद्रावर टोकण वाटणे व वेळेवर त्यांना लस संपल्याचे सांगणे यामुळे चांगलाच गोंधळ उडताना दिसत आहे. यात अनेक ज्येष्ठ नागरिकांना नाहक लसीकरण केंद्रावर फेऱ्या घालाव्या लागत असल्‍याने त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. बाहेर पडले तर कोरोनाची भिती आणि बाहेर पडल्याशिवाय लस मिळत नसल्याने वारंवार बाहेर पडावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचा संताप अनावर होताना दिसत आहे.

लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांसोबतही धक्काबुक्की
पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

मनपाच्या केंद्रावर वाद

नागरिकांना लसीकरणासंदर्भात अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती दिली जात नसल्याचे चित्र आहे. अधिकारी अरेरावीची भाषा वापरत असल्याने महानगरपालिकेच्या भरतीया रुग्णालयात बुधवारी सकाळी एका महिला अधिकाऱ्यासोबत लसीकरणासाठी आलेल्या महिलांचा वाद झाला.

आयुर्वेदिक रुग्णालयात धक्काबुक्की

रेल्वे स्‍थानक मार्गावरील आयुर्वेदिक रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर बुधवारी सकाळी नागरिकांनी बराच गोंधळ घातला. त्यामुळे येथे पोलिसांना बोलवावे लागले. मुख्य गेटमधून प्रवेश करण्यासाठी एकच गर्दी झाल्याने येथे पोलिस व नागरिकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रसंग उद्‍भवला. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांसोबतही धक्काबुक्की
न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार

कोविशिल्ड लसीचे १० हजार डोज थांबविणार गोंधळ

अकोला जिल्ह्यात लसीकरमाचा गोंधळ उडत आहे. त्यातच जिल्ह्यात कोवीशिल्डचे १० हजार डोज प्राप्त झाल्याने हा गोंधळ थांबविण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन लाख ५६ हजार ६२० डोज प्राप्त असून, पैकी दोन लाख ३१ हजार ४७४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या कोव्हॅक्सिनचे दोन हजार ९६० रोज उपलब्ध आहेत. याचा वापर फक्त दुसऱ्या लसीकरणासाठी आहे. कोविशिल्डचे २० हाजर ३४० डोज उपलब्ध असून, ती लस ७० टक्के दुसऱ्या डोजसाठी व ३० टक्के पहिला कोविशिल्ड डोज घेणाऱ्यांसाठी वापरली जाणार आहे. ही लस ४२ दिवसानंतरच घेता येईल.

१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण थांबविले

लसीकरणासाठी आवश्यक लस उपलब्ध होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटासाठीचे कोविड लसीकरण राज्य शासनाच्या सुचनेनुसार पुढील आदेशापर्यंत स्थगीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जवळपास सर्वच लसिकरण केंद्रावर टोकण वाटप करण्यात येत असून, ज्यांना टोकण देण्यात आले त्यांनीच लसीकरण केंद्रावर थांबावे. विणाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये व सोशल डिस्टंटीगचे नियम पाळावे, असे आवाहन माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मनिष शर्मा व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Confusion at the vaccination center; Pushback with the police

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com