esakal | पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

बोलून बातमी शोधा

पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः एकच रुग्ण...२४ तासात दोन कोरोना चाचण्या...दोघांचेही निकाल वेगवेगळे...रुग्ण संभ्रमात...खरा अहवाल कोणता?...आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा संतापजनक प्रकार बाळापूर ग्रामीण रुग्णालयात घडला आहे.

बाळापूर येथील अकोला नाका परिसरातील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अश्वजीत काशिराम सिरसाट (४१) यांनी ता.२३ एप्रिल रोजी कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, कोणतेही लक्षण नसताना आणि कोणताही त्रास होत नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अश्वजित यांना आरटी-पीसीआर अहवालाबाबत शंका आली. त्यामुळे ता. २४ एप्रिल रोजी ते अहवाल घेण्यासाठी बाळापूर ग्रामीण रुग्णालयात गेले.

हेही वाचा: राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!

तेथे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अहवालाबाबत आलेल्या शंकेबाबत माहिती दिली व पुन्हा कोरोना चाचणी करण्याची विनंती केली. त्यांनी आग्रह धरल्यामुळे व रुग्णाच्या आरोग्याची काळजी म्हणून पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. हा अहवाल मात्र निगेटिव्ह आला.

अवघ्या २४ तासात एकाच रुग्णाचे दोन वेगवेगळे अहवाल प्राप्त झाल्याने अश्वजित सिरसाट संभ्रमात पडले आहेत. एका अहवालानुसार ते पॉझिटिव्ह आहेत तर दुसरा अहवाला त्यांना निगेटिव्ह असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे पुढे नेमेक काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारामुळे अनेक रुग्णांना कोरोना संसर्ग झाला असल्यावरही केवळ अहवालातील घोळामुळे कोविड रुग्णालयात उपाचार घेता येत नसल्याचे तर संसर्ग नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कोविड उपाचार रुग्णांना घ्यावा लागला तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अहवालाबाबतचा हा घोळ थांबवून योग्य निदान करण्याची मागणी अश्विजित सरसाट यांनी केली आहे.

हेही वाचा: एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो

आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे मला ता. २३ व २४ एप्रिल रोजी केलेल्या दोन वेगवगेळ्या कोविड चाचण्यांचे दोन वेगवेगवेगळे अहवाल प्राप्त झाले आहेत. आता यातील खरा अहवाल कोणता समजावा? एखाद्या कमकुवत मनस्थिती असलेल्या व्यक्तीसोबत असे घडले असते तर अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने चाचणीचे निदान योग्य होण्यासंदर्भात सुधारणा कराव्यात आणि बाधित रुग्णांना योग्य वेळी योग्य उपाचार मिळावा, ही अपेक्षा आहे.

-अश्वजित सिरसाट, जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस, अकोला

संपादन - विवेक मेतकर