सोडचिठ्ठीच्या तयारीत असलेल्यांना कॉंग्रेसने दिली नवी जबाबदारी

कॉंग्रेस नेत्यांनी पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी सुरू केली आहे
Congress Party
Congress PartyCongress Party
Updated on

अकोला : शिवसेनेच्या (Shiv Sena) वाटेवर असलेले कॉंग्रेसचे (Congress) ग्रामीण उपाध्यक्ष राजेश भारती (Rajesh Bharti) यांची कॉंग्रेसने कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आता ते कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचा शिवसेनेतील अधिकृत प्रवेश लांबणीवर गेल्याने सदर घडामोडी घडल्याचे दिसत आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नाना पटोले (Nana Patole) यांच्या खांद्यावर आल्यानंतर जिल्ह्यातील नेतृत्वामध्ये बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार ग्रामीण व महानगरचे जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले. या बदलानंतर कॉंग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू झाली असून त्याचा फटका आगामी महापालिका व नगर परिषदेच्या निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे. पक्षातील घडामोडीनंतर महानगर व काही ग्रामीण भागात समर्थक असलेले दाेन पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी सुरू केली आहे.

Congress Party
तब्बल १५ देशांमध्ये चालते भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्स

अशा घडल्या होत्या घडामोडी

कॉंग्रेसचे ग्रामीण उपाध्यक्ष राजेश भारती, महानगराचे उपाध्यक्ष नितीन ताकवाले यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांची १९ ऑक्टाेबर राेजी मुंबईत भेट घेतली हाेती. तेथे सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार नितीन देशमुख, राजेश मिश्रा सुद्धा हाेते. तेव्हापासून त्यांच्या शिवसेना प्रवेश लांबला आणि संभाव्य प्रवेशाची दखल घेत कॉंग्रेसने राजेश भारती यांनी माेठी जबाबदारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Yavatmal Farmer Tragidy
78 year old MBBS doctor joins NEET protest
Soybean seed scam maharashtra
Statewide Strike After Pune Assault Hits Registration Services in Akola
Marathi News Esakal
www.esakal.com