स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे कॉँग्रेसचे संकेत

स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे कॉँग्रेसचे संकेत

अकोला: नुतकाच कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा अकोला दौरा पार पडला. पत्रकारांशी संवाद साधताना कॉँग्रेस स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे संकेतही दिले. नाना पटोलेंनी जिल्हा दौऱ्यावर असताना अधिकृत बैठक घेतली नसली तरी प्रमुख नेत्यांच्या घरी दिलेल्या भेटीदरम्यान फेरबदलाबाबत चाचपणी केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. आगामी काळात नाना अकोल्यात मुक्कामी येत असून त्यानंतर मोठ्या घडामोडींची शक्यता आहे. (Congress signals to fight local elections on its own)

स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे कॉँग्रेसचे संकेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कापशी सरपंचांशी संवाद

स्थानिक राजकारणात काँग्रेस खूप मागे असून, पक्ष संघटन मजबूत करत अंतर्गत कुरघोडीवर मात करणे आवश्यक अाहे, याची जाणीव प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात नेत्यांना झाली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी नानांनी स्वराज्य भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेला महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रवक्ते अतुल लोंढे, महानराध्यक्ष बबनराव चौधरी, ग्रामीणचे अध्यक्ष हिदायत पटेल, राजेश भारती, प्रदीप वखारीया, प्रकाश तायडे, नगरसेवक साजिद खान पठाण, सुनील धाबेकर, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, प्रदीप वखारीया, प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, नातिकोद्दीन खतीब, मदन भरगड, मनपा रमाकांत खेतान, अविनाश देशमुख, कपिल रावदेव आदी उपस्थित होते.

स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे कॉँग्रेसचे संकेत
कोरोना आटोक्यात येताच पाणीटंचाई; जिल्ह्यात ५३ विंधन विहीरींसह २३ कूपनलिका मंजूर

अनेकांच्या घरी भेटी

प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी पक्ष संघटनेत फेरबदल करण्यापूर्वी अकाेल्यातील प्रमुख नेत्यांच्या घरी भेटी दिल्या. यात माजी मंत्री अजहर हुसेन, मनपाचे गट नेते साजिद खान पठाण, मदन भरगड, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, प्रकाश तायडे व राजेश भारती यांचा समावेश हाेता. यातील बहुतांश जण हे दुसऱ्या फळीतील पदाधिकारी-नेते आहेत. अनेक जण प्रमुख पदांसाठीचे दावेदार आहेत. नानांनी भेटीत अनेक विषयांवर चर्चा करुन चाचपणीही केली. लवकरच या भेटीचे परिणाम पहावयास मिळतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.

स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे कॉँग्रेसचे संकेत
जनाधार असलेले नेतृत्व पक्षाबाहेर; ‘हायकमांड’ संस्कृतीनेच लागली काँग्रेसची वाट
स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे कॉँग्रेसचे संकेत
मेहकर कॉंग्रेसमध्ये गटबाजी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीने प्रश्न मिटेल का?

पक्ष संघटनेसाठी योग्य प्रयत्न

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेत आहेत. मात्र त्यांची अकोल्यात अधिकृतपणे बैठक झाली नाही; परंतु त्यांनी काँग्रेस पक्ष संघटनेच्या सुदृढ आराेग्यसाठी लवकरच योग्य त्या ‘डोस’ दिला जाईल, असे सांगून राज्यात तालुकास्तरापर्यंत संघटनेत बदलाचे संकेत दिले. संघटनेत मोठ्याप्रमाणावर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मतभेद-हेवेदावे प्रत्येक पक्षातच असतात. मात्र यापुढे पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवण्याची संधी मिळणार नाही, असा दावाही त्यांना नानांनी केला.

Congress signals to fight local elections on its own

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com