esakal | कॉंग्रेसमध्ये गटबाजी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीने प्रश्न मिटेल का?
sakal

बोलून बातमी शोधा

मेहकर कॉंग्रेसमध्ये गटबाजी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीने प्रश्न मिटेल का?

मेहकर कॉंग्रेसमध्ये गटबाजी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीने प्रश्न मिटेल का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संतोष अवसरमोल

घाटबोरी (जि.बुलडाणा) : मेहकर मतदार संघात (Mehkar constituency) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांचा दौरा जरी कोविड सेंटरच्या भेटीनिमित्त असला तरी या दौऱ्यातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मेहकर तालुक्यातील कॉंग्रेस पक्ष बांधणीसाठी कामही यावेळी करतील,असा राजकीय अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर व मेहकर विधानसभा पक्षनेते अॅड अनंतराव वानखेडे यांचा एक गट तर माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मनदादा घुमरे व नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांचा दुसरा गट असे उघड दोन गट निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. (Will Nana Patole's visit end factionalism in Buldana Congress?)

मेहकरात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येत असल्याने दोन्ही गटाकडून जय्यत तयारी केली आहे.मात्र यावेळी कॉंग्रेस पक्षात एकजुट दिसणार की गटबाजी उफाळून येणार याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.मेहकरात कॉंग्रेस पक्षाला लागलेली घरघर परिणामी पक्षाला तालुक्यात मोठी फुटीची लागण झाली आहे.

हेही वाचा: नक्षत्रावरून कसा पडतो पाऊस? मृग, मेंढा, उंदीर, म्हैस या नावांची गंमत तरी काय?

या फुटीमुळे तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व दिवसेंदिवस घटू लागले आहे.आगामी नगरपरिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून दोन्ही गटाकडून नगरपरिषदेचे गटबाजीचे रणशिंग फुंकले आहे त्यामुळे पक्षात अशी फुट कायम राहलीतर यांना विजयाच्या आसपासही जाता येणार नाही.यांच्या गटबाजीत नगरपरिषद हातची जाऊन शिवसेना पक्षाचा झेंडा नगरपरिषदवर डोलाने फडकणार आहे यात मात्र तिळमात्र शंका नाही.राज्यात सत्तांतर होत शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात अच्छे दिन आल्याचे मिळत असताना मेहकर तालुक्याला अपवाद असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हेही वाचा: Buldhana; खरिपात सोयाबीन खातेय भाव, घरगुती बियाणे नसल्याने शेतकर्‍यांची अडचण

सलग पंचविसवर्षापासुन मेहकर विधानसभा मतदार संघात कॉग्रसमधील गटबाजी कायम असुन,येथे मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला अंतर्गत गटबाजीने पोखरल्याने काँग्रेस पक्षात कार्यकर्ते कमी व नेत्यांचा भरणा जास्त झाल्याने काँग्रेस नेत्यांना आता कार्यकर्ते जुमानत नसल्याने काँग्रेस ही फक्त नावापुरती उरली आहे.मेहकर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या नेत्यांची धरपड नसुन,फक्त कोणत्या कामाचे फोटोशन करुन प्रसिध्दी मिळवण्यात आता कॉगेस नेते अग्रेसर आहेत.

नाना पटोले

नाना पटोले

गटबाजी राजकारण हे सत्तेसाठी करायचे असते,हे ठिक,परंतु सत्ता कशासाठी त्याचाही एक विचार व दिशा असायला पाहिजे.सत्तेचे राजकारण करत असताना तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जबाबदारी पेलण्यासाठी नेते सुध्दा सक्षम असायला हवे.कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून चालणार नाही.त्यामुळे आतातरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यातून एकी दिसुन येईल का!व पक्षाची पुन्हा एकदा एकत्रित बांधणी होईल का!अशी चर्चा सध्या मेहकर तालुक्यात सुरू आहे.

संपादन - विवेक मेतकर

Will Nana Patole's visit end factionalism in Buldana Congress?

loading image
go to top