बांधकाम नकाशे मंजुरी प्रक्रिया झाली सोपी | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीपीएमएस ऑनलाइन सीपीआर कार्यान्वित; राज्यातील पहिली कार्यशाळा अकोल्यात

अकोला : बांधकाम नकाशे मंजुरी प्रक्रिया झाली सोपी!

अकोला : बांधकाम करावयाचे म्हणजे महानगरपालिकेकडून नकाशे मंजुरीची डोकेदुखी. त्यात ऑनलाईन मंजुरी सुरू झाल्यापासून तर नागरिक व बांधकाम व्यावसायिक अधिक त्रस्त झाले होते. मात्र, आता ही ऑनलाईन मंजुरी अधिक सोपी करण्यात आली असून, यापूर्वी येणाऱ्या तांत्रिक अडचणी व प्रणालीत त्रुटी दूर करण्यात आली. याबाबतची राज्यातील पहिली कार्यशाळा अकोल्यात आयोजित करण्यात आली होती.

शासनाने मंजूर केलेल्या बांधकाम नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली व बिल्डींग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम (बीपीएमएस) या संगणकीय प्रणालीद्वारे मंजुरी व त्यातील समस्यांचे निराकरणन करण्यासाठी अकोला महानगरपालिका आयुक्त यांच्या पुढाकाराने अकोला मनपा, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, आर्किटेक्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिली कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अकोला येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून या संगणकीय प्रणालीचे प्रभारी व युडीआरसीचे सहनिर्माते राज्याच्या नगररचना एमआयडीसीचे संचालक अविनाश पाटील, नगर रचना विभाग पुणेचे माजी सहसंचालक प्रकाश भुक्ते उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी, नीमा अरोरा, आयुक्त कविता द्विवेदी उपस्थित होत्या. मुख्य उपस्थितीतांमध्ये कन्सल्टींग सर्विसेस सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनीयर पंकज कोठारी, क्रेडाईचे राज्य सचिव अध्यक्ष दिनेश ढगे, आर्किटेक्चर असोशियनचे अध्यक्ष आर्किटेक्चर सुमित अग्रवाल, सचिव इंजिनीयर इस्माईल नाजमी, उपाध्यक्ष जितेंद्र पातुरकर, सचिव कमलेश कृपलानी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: कोल्हापूर : भास्कर गँगकडून प्लॉटसाठी धमकी : पाच अटकेत

बांधकाम क्षेत्र विकास व रोजगारासोबतच शासकीय महसुलाचे मोठे स्त्रोत आहे. त्याला चालना देणे गरजेचे आहे. त्यानुसार बांधकाम नकाशे मंजुरी करण्यासाठी राज्य शासनाने बीपीएमएस संगणकीय प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर अकोला येथे सुरू केल्यानंतर ती पूर्ण विकसित नव्हती. टप्प्याटप्प्याने त्यात अनेक अडचणी आल्यात व त्या दुरुस्त होत गेल्यात. वास्तुविशारद, स्थापत्य अभियंता संघटनांनी याबाबत राज्य सरकार व मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन ऑनलाइन बीपीएमएस प्रणाली योग्यरीत्या हाताळता यावी, त्यातील बारकावे समजून घेता यावे यासाठी कार्यशाळा घेण्याची मागणी केली होती. त्यावर मनपा प्रशासनाने दखल घेत पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा अकोल्यात आयोजित केली. या कार्यशाळेत बांधकाम नकाशे मंजुरीबाबतच्या शंकाचे निराकरण करण्यात आले.

मनपा आयुक्त यांनी निर्माण क्षेत्रातील भविष्यातील कार्य संकल्पना व्यक्त करीत ‘अकोला विजन’ची संकल्पना मांडली. कार्यशाळेतील प्रश्नोत्तराचे सत्र पंकज कोठारी, ईस्माईल नाजमी, अतुल बंग यांनी संचालित केले. प्रकल्प व्यवस्थापक मुंबईचे विनायनक पडेलकर, प्रकल्प सल्लागार मंडळाचे श्रीकांत कुलकर्णी, अंमलबजावणी व्यवस्थापक सुनील गायतोंडे, व्यवसाय विश्लेषक व सॉफ्टवेअर डेव्हलपर मुंबईचे आदींनी सहभाग घेत मॅपद्वारे दुरुस्तीचे कार्य केले. या कार्यशाळेत नगररचना विभागाचे अतिरिक्त संचालक वाघाडे, दांदळे, साबळे, मानकर मनपाचे सर्व अभियंते, अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील तंत्रज्ञ, नगररचना अधिकारी व बांधकाम स्थापत्य व निर्माण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजनाकरिता मनपाच्या नगररचना विभागाचे अतिरिक्त संचालक वाघाडे, सुरेश वासनकर, संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, बांगर यांच्या सोबत एसीसीईतर्फे कोषाध्यक्ष शेखर मुखेडकर, अजय लोहिया, मकरंद पांडे, अभिजीत परांजपे, रिजवान कुरेशी, आर्किटेक्चर असोसिएशनतर्फे जयप्रकाश राढी, ईश्वर आनंदानी, सर्वेश केला, हर्षल वाकोडे, पवन बंग, क्रेडाईतर्फे शरद सावजी, सुमित मालानी, परेश कोठारी विजय तांदळे यांनी परिश्रम घेतले.

loading image
go to top