भास्कर गँगकडून प्लॉटसाठी धमकी; पाच अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

कोल्हापूर : भास्कर गँगकडून प्लॉटसाठी धमकी : पाच अटकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जागेच्या कारणावरून एकास दमदाटी करून धमकी दिल्या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात जवाहरनगरातील भास्कर गँग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गॅंगमधील पाच जणांना अटक केल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. अटक केलेल्यांमध्ये अमोल महादेव भास्कर, महादेव शामराव भास्कर, अमित ऊर्फ पिंटू महादेव भास्कर, शंकर शामराव भास्कर, संकेत सुदेश व्हटकर (सर्व रा. जवाहरनगर) यांचा समावेश असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : एका व्यक्तीने १९९९ मध्ये जवाहरनगरातील एक जागा खरेदी केली. त्या जागेची बाजारभावाप्रमाणे किंमत ८० ते ९० लाख रुपये आहे. या जागेच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी कुंपण घातले. गेटला कुलूप लावले होते.

हेही वाचा: IMD : मध्य महाराष्ट्र, कोकणात आज पावसाची शक्यता

ते प्लॉटची पाहणी करण्यासाठी आले असताना संशयित अमोल, महादेव, अमित, शंकर भास्कर आणि संकेत व्हटकर या पाच जणांनी त्यांना जागा नावावर कर म्हणून दमदाटी करून धमकावले, अशी फिर्याद संबंधित मालकाने दिली.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी भास्कर गँगच्या संबधित पाच संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्या सर्वांना बुधवार (ता. २४)पर्यंत कोठडी सुनावली. दरम्यान, या गँगविरोधात खंडणी, धमकी, बेकायदेशीर सावकारी अशा संदर्भातील तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन निरीक्षक ओमासे यांनी केले.

loading image
go to top