
श्रीकांत राऊत
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात वाढीव १०० खाटांच्या क्षमतेच्या ‘मॅटर्नल चाइल्ड हेल्थ विंग’चे २०१९-२० मध्ये बांधकाम सुरू करण्यात आले होते. इमारतीचे बांधकाम मार्च-२०२४ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाला देण्यात आली होती. डेडलाईन संपून आता दीड वर्ष होत आले आहे. मात्र, अद्यापही हे बांधकाम अपूर्णच असल्याचे वास्तव आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) कडून कंत्राटदाराचे ८ कोटींचे देयक थकल्याने काम रखडले आहे.