esakal | Corona Cases in Akola; आणखी दोघांचा बळी; ६३ नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Cases in Akola; आणखी दोघांचा बळी; ६३ नवे पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola; आणखी दोघांचा बळी; ६३ नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त दोन रुग्णांचा मंगळवारी (ता. १५) मृत्यू झाला. त्यासोबतच ६३ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ११८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सध्या जिल्ह्यात १ हजार २३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Corona Cases in Akola; Two more victims; 63 new positives)

हेही वाचा: शेतकऱ्यांची फसवणूक करून होतेय बी-बियाणे व खतांची विक्रीकोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १५) जिल्ह्यात ७३६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७०७ अहवाल निगेटिव्ह तर २९ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्या ६३ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या २९ अहवालांमध्ये १६ महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा: युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते

संबंधित रुग्ण मूर्तिजापूर तालुक्यात चार, बार्शीटाकळी-दोन, बाळापूर-तीन, अकोट-पाच, तेल्हारा-चार, अकोला ग्रामीणमध्ये पाच तर मनपा क्षेत्रात सहा आढळले. याव्यतिरिक्त कोरोनामुळे हिवरखेड ता. तेल्हारा येथील ४८ वर्षीय पुरुष व बाबुळगाव येथील ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १ हजार ११६ झाली आहे.

हेही वाचा: महानगरपालिकेत घडला ‘इतिहास’; स्वच्छतेसाठी सर्वपक्षीय ‘एकजुट’कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५७२२३
- मयत - १११६
- डिस्चार्ज - ५४८७४
- ॲक्टिव्ह रुग्ण - १२३३


Corona Cases in Akola; Two more victims; 63 new positives

loading image