कोरोनाचा परिणाम; सलग दुसऱ्या सत्रातही जुनाच अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा परिणाम; सलग दुसऱ्या सत्रातही जुनाच अभ्यासक्रम

कोरोनाचा परिणाम; सलग दुसऱ्या सत्रातही जुनाच अभ्यासक्रम

तेल्हारा (जि.अकोला) ः इयत्ता बारावी आणि तिसरीचा अभ्यासक्रम बदलण्याचे सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात नियोजन होते; पण देशभर कोरोना (Corona) आल्याने लॉकडाउन घोषित करण्यात आला. शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके (New curriculum books) छपाई पूर्णपणे करून विद्यार्थ्यांच्या हाती देता येतील की नाही ही शंका असल्याने जुनाच अभ्यासक्रम कायम ठेवून पुस्तकांची छपाई करण्यात आली. यंदा देखील लॉकडाउन सुरू झाल्याने अद्यापपर्यंत तिसरीचा अभ्यासक्रम बाबत निर्णय झाला नाही. Corona effect; The same course for the second session in a row

येणारी पिढी अधिक हुशार असल्याने तसेच गुणवत्ता वाढीसाठी व अभ्यासक्रमातील तोच तो पणा काढण्यासाठी शिक्षण विभाग ठराविक वर्षानंतर अभ्यासक्रमांत बदल करून नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती सोपवतात. सन२०१९-२० या शैक्षणिक सत्रात इयत्ता अकरावी व दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला तर सन २०२०-२१ मध्ये इयत्ता बारावी व तिसरीचा अभ्यासक्रम बदलण्याचे नियोजन होते.

हेही वाचा: पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

त्या सत्रात बारावीचा अभ्यासक्रम बदलून नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आली. पण मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. अशा परिस्थितीत तिसरीचे पुस्तके छापून जूनमध्ये विद्यार्थ्यांच्या हाती देणे शक्य होईल की नाही, असे वाटल्याने तिसरीच्या अभ्यासक्रम ‘जैसे थे’ ठेऊन पुस्तके छापून वितरित करण्यात आले.

हेही वाचा: न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार

सन २०२१-२२ मध्ये तिसरीच्या अभ्यासक्रम बदलण्यात येईल, असे अपेक्षित होते. पण गेले वर्षभर लॉकडाउन सदृश्य स्थिती होती. आता तर कडक लॉकडाउन आहे. ता.२८ जूनला नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. असे असताना तिसरीच्या अभ्यासक्रमाबाबत कोणत्याच सूचना नाहीत. त्यामुळे यावर्षी देखील ‘जैसे थे’ अभ्यासक्रम राहणार असल्याचे चित्र आहे.

अभ्यासक्रम बदलत असल्यास शाळांना सूचना दिली जाते. यावर्षी तिसरीच्या अभ्यासक्रम बदलाबाबत सूचना मिळाली नाही. त्यामुळे जुनाच अभ्यासक्रम राहणार आहे, असे वाटते.

- तुळशीदास खिरोडकार, आदर्श उपक्रमशील, जि. प.शिक्षक

संपादन - विवेक मेतकर

Corona effect; The same course for the second session in a row

Web Title: Corona Effect The Same Course For The Second Session In A

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akola
go to top