esakal | कोरोनाचा कहर सुरूच; ५६४ नवे रूग्ण आढळले

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा कहर सुरूच; ५६४ नवे रूग्ण आढळले

कोरोनाचा कहर सुरूच; ५६४ नवे रूग्ण आढळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आठ रुग्णांचा शुक्रवारी (ता. २३) मृत्यू झाला. त्यासोतबच ५६४ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ३०४ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ६१० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २३) २ हजार १२८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ७४५ अहवाल निगेटिव्ह तर ३८३ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या अहवालात १८१ रुग्ण आढळल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात ५६४ नव्या रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या ३८३ अहवालांंमध्ये १४३ महिलांच्या व २४० पुरुषांच्या अहवालांचा समावेश आहे.

तेल्हाऱ्या सर्वाधिक कमी रुग्ण
तेल्हारा तालुक्यात शुक्रवारी सर्वात कमी ११ रुग्ण आढळले. मूर्तिजापूरमध्ये २९, अकोट-५४, बाळापूर-२९, बार्शीटाकळी-१८, पातूर-२०, अकोला ग्रामीण-३८ तर अकोला मनपा क्षेत्रात १८४ नवे रुग्ण आढळले.

असे आहेत मृतक
- पहिला मृत्यू टाकळी खु., अकोट येथील ३५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.
- दुसरा मृत्यू काजळेश्वर ता. बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते.
- तिसरा मृत्यू भवानी पेठ येथील ५१ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते.
- चौथा मृत्यू अशोक नगर ता. अकोट येथील ५३ वर्षीय महिलेचा झाला. या महिलेस दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.
- पाचवा मृत्यू जुने शहर येथील २४ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते.
- सहावा मृत्यू कौलखेड येथील ७१ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते.
- सातवा मृत्यू जुने शहर येथील ५५ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते.
- आठवा मृत्यू सिव्हील लाईन येथील ७० वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात झाला. या महिलेला दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ३६७०९
- मयत - ६१०
- डिस्चार्ज - २९६७७
- ॲक्टिव्ह रूग्ण - ६४२२

संपादन - विवेक मेतकर