अरे देवा!  जिल्हा परिषदेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव, अर्थ विभागातील कर्मचारी पॉझिटिव्ह

सुगत खाडे  
Wednesday, 19 August 2020

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत शिरकाव केला आहे. अर्थ विभागात कार्यरत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे जि.प.च्या आरोग्य विभागामार्फत अर्थ (लेखा) विभागाचे मंगळवारी (ता. १८) निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्यात आले.

अकोला  ः जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत शिरकाव केला आहे. अर्थ विभागात कार्यरत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे जि.प.च्या आरोग्य विभागामार्फत अर्थ (लेखा) विभागाचे मंगळवारी (ता. १८) निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्यात आले.

त्यासह संबंधित कर्मचाऱ्याच्या संपर्कातील अतिजोखमीच्या चार कर्मचाऱ्यांची रॅपिड ॲंटीजन टेस्ट करण्यात आली असून त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. महानगरातून शहर व आता गाव खेड्यात पोहचलेल्या कोरोनाने शासकीय कार्यालयात सुद्धा शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतीभा भोजने यांच्या कक्षात कार्यरत शिपायालाच कोरोनाची लागन झाल्याची बाब २३ जुलैरोजी घडली होती.

त्यानंतर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाहेरील नागरिकांना जिल्हा परिषदेत प्रवेश बंदी सुद्धा करण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी (ता. १८) पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कक्षाला सील
अर्थ विभागातील कक्षाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर कक्षाला सिल करण्यात आले. सदर कक्ष पुढील काही दिवस बंदच राहिल. कक्ष निर्जंतुकीकरण करण्याचे काम जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुनिल मानकर, डॉ. आदित्य महानकर, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona re-enters Akola News Zilla Parishad, finance department staff positive