
धोक्याची घंटा, सहा बालकांना कोरोनाची लक्षणे
अकोला ः राज्यात कोरोनाची तिसरी लाट (The third wave of corona in Maharashtra) येणार असल्याचे इशारे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिले आहेत. त्यातच अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात (Akola District General Hospital) सहा बालकांना कोरोनाची लक्षणे (Symptoms of corona in children) दिसून आलीत. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना जास्त असल्याचे संकेत मिळत आहे. Corona symptoms in six children in Akola
अकोला जिल्हा प्रशासनाने लहान मुलांसाठी वेगळे कॉविड सेंटर सुरू करावे किंवा तशी त्याच्यासाठी वेगळे नियोजन करून व्यवस्था करावी. अकोल्यातील बालकांचे बळी जाण्यापूर्वी उपाययोजयना करा, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सदस्य सतिष भागवत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा: पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे बळी घेतले आहे. नाइलाजास्तव संपूर्ण लॉकडाउन करण्याची गरज शासनाला पडली आहे. लस उपलब्ध झाल्याने कोरोनाची भीती थोडी कमी झाली असली तरीही कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
हेही वाचा: न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार
या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असणार असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले असल्याने लहान मुलांचे बळी जाण्यापूर्वीच उपाययोजना करा. अशी मागणी भागवत यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
संपादन - विवेक मेतकर
Corona symptoms in six children in Akola
Web Title: Corona Symptoms In Six Children In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..