esakal | जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी

बोलून बातमी शोधा

जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी

जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि.वाशीम) : जिल्हाबंदी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस. यांचे आदेशानंतर महसूल व पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची कोरोना चाचणी केली जात आहे. यावर तहसीलदार अजित शेलार व ठाणेदार एस.एम. जाधव स्वतः लक्ष घालून आहेत.

प्रशासनाच्या वतीने लोणार-मेहकर फाटा, सेनगाव रोड, वाशीम रोड या ठिकाणी लावण्यात आलेल्या शिबिरात वाहनांना थांबवून त्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात आहे. या व्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या लोकांची सुद्धा चाचणी केली जात आहे. चाचणी केल्यानंतर अहवाल संबंधित व्यक्तीच्या गावी, संबंधित प्रशासनाला कळविण्यात येणार आहे.

यामुळे कोरोनाची चेन तोडण्यात हे पाऊल उपयुक्त ठरेल, असे बोलले जात आहे. जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांच्या पहारा व्यतिरिक्त आरोग्य प्रशासनाच्या वतीने प्रत्येक व्यक्तिची चाचणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अनुषंगाने तहसील कार्यालय व पोलिस प्रशासनाच्या वतीने सकाळी अकरा वाजल्यानंतर बिनकामी फिरणाऱ्या व्यक्ती, तसेच शहराबाहेर जाणाऱ्या व जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची चाचणी केली जात आहे. जेणेकरून यामुळे कोरोनाची साखळी तोडली जाऊ शकत असल्याचे तहसीलदार अजित शेलार यांनी सांगितले.

संपादन - विवेक मेतकर