
अकोला ः कोरोना विषाणूच्या (Corona virus) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील १५१ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona preventive vaccination) करण्यात येत आहे, परंतु कोरोनाची लस संपल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्रांवरील लसीकरण मोहिमेत खंड पडला. त्यामुळे जिल्ह्यातील केवळ तीनच लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यामध्ये मलकापूर व शिवर येथील अंगणवाडी आणि मूर्तिजापूर येथील एका लसीकरण केंद्राचा समावेश आहे. (Corona vaccination stopped! Stocks depleted, vaccination at only three centers)
संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्या संख्येने लस घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असल्याने लशींचा नेहमीच तुटवडा सुद्धा जाणवत आहे. दरम्यान रविवारी (ता. २३) अकोला शहरातील बहुतांश लसीकरण केंद्रावरील लसीकरण मोहीम ठप्प पडल्याचे दिसून आले. लसच उपलब्ध नसल्याने लस मिळाल्यावर लस देण्यात येईल, असे फलक बहुतांश केंद्रांच्या बाहेर लावण्यात आले होते.
असे झाले लसीकरण (रविवारी दुपारी ४ पर्यंत)
- शिवर आंगणवाडी - १४९ लाभार्थी
- मलकापूर आंगणवाडी - १५८ लाभार्थी
- मूर्तिजापूर - १८७ लाभार्थी
संपादन - विवेक मेतकर
(Corona vaccination stopped! Stocks depleted, vaccination at only three centers)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.