दवाखान्यातच सहा रुग्ण दगावले; आढळले ४०८ नवे रुग्ण

सहा रुग्ण दगावले; आढळले ४०८ नवे रुग्ण
सहा रुग्ण दगावले; आढळले ४०८ नवे रुग्ण

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त ६ रुग्णांचा रविवारी (ता. २३) बळी गेला. त्यासोबतच ४०८ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ६१५ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. (Akola Corona death and today's patient)

कोरोना संसर्गाचे रविवारी (ता. २३) २ हजार १३८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ८७६ अहवाल निगेटिव्ह तर २६२ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत १४६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण ४०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

सहा रुग्ण दगावले; आढळले ४०८ नवे रुग्ण
महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर

आरटीपीसीआरच्या चाचणीत १११ महिला व १५१ पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात मूर्तिजापूरमध्ये ३२, अकोट-३७, बाळापूर-१३, तेल्हारा-२५, बार्शीटाकळी-२०, पातूर-१६, अकोला ग्रामीणमध्ये ३० तर महापालिका क्षेत्रातील ८९ रुग्णांचा समावेश आहे.

सहा रुग्ण दगावले; आढळले ४०८ नवे रुग्ण
पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय

असे आहेत मृतक

गजरखेड आपातापा येथील ५० वर्षीय पुरुष, कृषी नगर येथील ६१ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६१ वर्षीय पुरुष,

मूर्तिजापूर येथील २७ वर्षीय पुरुष, गीता नगर भागातील ५५ वर्षीय महिला, मूर्तिजापूर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा रविवारी (ता. २३) कोरोनामुळे मृत्यू झाला.

सहा रुग्ण दगावले; आढळले ४०८ नवे रुग्ण
म्युकरमायकोसीस आजार कसा ओळखाल? गैरसमजच अधिक; घ्या योग्य उपचार

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ५३७५५

- मयत - १०१०

- डिस्चार्ज - ४६३३२

- ॲक्टिव्ह रुग्ण - ६४१३

संपादन - विवेक मेतकर

Akola Corona death and today's patient

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com