esakal | आणखी १६ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

आणखी १६ जणांचा मृत्यू

आणखी १६ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त १६ जणांचा सोमवारी (ता. २६) मृत्यू झाला. त्यासोबतच ३७१ नवे रुग्ण आढळले. कोरोनावर मात करणाऱ्या ७३७ जणांना डिस्चार्ज देण्यात सुद्धा आला.त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५ हजार ६१५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. २६) जिल्ह्यात एक हजार ४०३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार १३९ अहवाल निगेटिव्ह तर २६४ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत १०७ नवे रुग्ण आढळल्याने सोमवारी एकूण ३७१ नवे रुग्ण आढळले. आरटीपीसीरच्या चाचणीत २६४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ९४ महिला व १७० पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूर तालुक्यात १६, अकोट-१२, बाळापूर-३२, तेल्हारा-१९, बार्शीटाकळी-०२, पातूर-५५, अकोला ग्रामीण-२५, तर मनपा क्षेत्रात १०३ अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान आतापर्यंत एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८ हजार ०४३ झाली आहे.

असे आहेत १६ मृतक

- पहिला मृत्यू बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिलेचा सोमवारी (ता. २६) मृत्यू झाला. या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते.

- दुसरा मृत्यू दहातोंडा ता. मूर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते.

- तिसरा मृत्यू रामदासपेठ येथील ६४ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते.

- चौथा मृत्यू किनखेड ता. बार्शीटाकळी येथील ५० वर्षीय पुरुषाचा झाला. या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.

- पाचवा मृत्यू मो. अली रोड सिटी कोतवाली येथील ६१ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते.

- सहावा मृत्यू डाबकी रोड येथील ३९ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते.

- सातवा मृत्यू खदान येथील ३५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.

- आठवा मृत्यू देवरी ता.अकोट येथील ५५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते.

- नऊवा मृत्यू खदान येथील ३५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.

- दहावा मृत्यू आंबेडकर नगर येथील ६४ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.

- अकरावा मृत्यू चिखलगाव येथील ८५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते.

- बारावा मृत्यू मोठी उमरी येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते.

- तेरावा मृत्यू व्याळा ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते.

- चौदावा मृत्यू खासगी रुग्णालयातून तिघांचे मृत्यू झाले. त्यात जनूना ता.बार्शीटाकळी येथील ७६ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते. पधरावा मृत्यू सिंधी कॅम्प येथील ६५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. सोळावा मृत्यू गोरक्षण रोड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ३८०४३

- मयत - ६४५

- डिस्चार्ज - ३१७८३

- ॲक्टिव्ह रुग्ण - ५६१५

संपादन - विवेक मेतकर

loading image