esakal | तुम्हारा कोरोनाचा मुक्काम पोस्ट माहित आहे का? नसेल तर ही बातमी वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

diabeties akola.jpg

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत प्रत्येक दिवशी नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असेलेल्या रुग्णांना कोरोनाची बाधा अधिक लवकर होत, असा दावा करण्यात येत आहे. परंतु त्याही पेक्षा वेगळी माहिती अकोला जिल्ह्यात समोर आली आहे. त्यानुसार मधुमेहग्रस्त रुग्णांनाच कोरोनाची सर्वाधिक लागण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा ‘मुक्काम पोष्ट’ मधुमेहाचे रुग्ण असल्याची बाब समोर आली आहे. 

तुम्हारा कोरोनाचा मुक्काम पोस्ट माहित आहे का? नसेल तर ही बातमी वाचा

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत प्रत्येक दिवशी नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असेलेल्या रुग्णांना कोरोनाची बाधा अधिक लवकर होत, असा दावा करण्यात येत आहे. परंतु त्याही पेक्षा वेगळी माहिती अकोला जिल्ह्यात समोर आली आहे. त्यानुसार मधुमेहग्रस्त रुग्णांनाच कोरोनाची सर्वाधिक लागण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा ‘मुक्काम पोष्ट’ मधुमेहाचे रुग्ण असल्याची बाब समोर आली आहे. 

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलं आहे. जिल्ह्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 39 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. त्यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठशेवर पोहचली आहे.

कोरोनाशी सामना करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, आयसोलेशन व संस्थागत क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास संशयितांची चाचणी केली जात आहे, परंतु जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढलेल्या रुग्णांमध्ये मधुमेह (डायबिटीज) असणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे मधुमेहग्रस्त नागरिकांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. 

आहार-विहारावर लक्ष आवश्‍यक
अनियमित जीवनशैली व सतत मानसिक ताण-तणावामुळे मधुमेहासारखा रोग व्यक्तीला होतो. या रोगापासून बचाव करण्यासाठी आहार-विहारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना डॉक्टर देतात. या रोगाने ग्रस्त व्यक्तीलाचा कोरोनाचा अधिक धोका असल्यमुळे अशा रुग्णांना डॉक्टरांना आहार-विहाराकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. 

मधुमेहग्रस्तांनाही धोका, काळजी घ्या
अकोला शहरातील मधुमेहग्रस्त व्यक्तींनाच कोरोनाची सर्वाधिक लागण होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मधुमेहग्रस्तांनी काळजी घ्यावी. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी. गरज भासल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा. 
- डॉ. फारुक शेख
वैद्यकीय अधिकारी, महापालिका, अकोला

loading image