कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रा.स्व.संघाचे कोविड केअर सेंटर

श्रीमती शोभादेवी गोयनका कोविड केअरचे लोकार्पण संपन्न
कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रा.स्व.संघाचे कोविड केअर सेंटर

अकोला ः : 'जनसेवा ही ईश्वर भक्ती' या उक्तीप्रमाणे काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अकोला येथे कोरोना बधितांच्या अलगिकरणासाठी आदर्श संस्कार मंडळाद्वारे संचालित शोभादेवी गोयनका कोविड केअरचे लोकार्पण बुधवार, ता.५ मे रोजी श्रीमती शोभादेवी गोयनका यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मंचावर शोभादेवी गोयनका, रा.स्व.संघाचे विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेवाल उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णांकरिता विविध ठिकाणी मोजक्याच उपलब्ध खाटा ही विषम स्थिती कमी व्हावी या उद्देशाने हे कोविड सेंटर सुरू केल्याचे यावेळी बोलताना प्रा. नरेंद्र देशपांडे यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत समाज कोरोना महामारीची पीडा सोसतो आहे. जीवित हानीसह ही महामारी विविध आघात करीत आहे.

या आघातात काही अंशी का होईना दिलासा मिळाला हाही हेतू या कोविड केंद्राचा आहे. शासनाच्या विविध परवानगी मिळाल्यानंतर लोकार्पण झाले मात्र पुढील परवानगी लवकर मिळाल्यास बाधितांवर उपचारासाठी डेडीकेटड कोव्हिड सेंटरची सुरु करनार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी सुसज्ज सेंटरचा गरजुनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या प्रसंगी अमित गोयनका व डॉ. सदानंद भुसारी, डॉ. पार्थसारथी शुक्ला, रामेश्वरजी फुंडकर, शंतनू जोशी, महानगर कार्यवाह रुपेश शहा,सेवाप्रमुख माणिक नालट, सुनील पसारी उपस्थित होते. अकोला, वाशीम व बुलडाणा विभागातील गरजू रुग्णांनी या सुसज्ज कोव्हिड सेंटरचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख मोहन मिश्रा व सहप्रमुख भूषण पिंपळगांवकर तसेच आदर्श संस्कार मंडळ, अकोलाचे अध्यक्ष विनोद देशमुख व सचिव शशांक जोशी यांनी केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com