कोविड लॅबने गाठला एक लाखाचा पल्ला; दररोज तपासणी करिता येत आहे तीन ते चार हजार नमुने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Covid Lab in Buldana has tested one lakh samples in five months

जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या स्वॅब, नमुने जिल्ह्यातच तपासणी होत असल्याने अहवाल लवकर प्राप्त होत आहे. कोरोनाच्या रोग्याला योग्य वेळी उपचार घ्यायला खूप मदत होत आहे. या कोरोना योद्धावर नमुने तपासणीची जबाबदारी आहे.

कोविड लॅबने गाठला एक लाखाचा पल्ला; दररोज तपासणी करिता येत आहे तीन ते चार हजार नमुने

बुलडाणा : दीर्घ प्रतीक्षेनंतर बुलडाणा शहरात कोरोना टेस्टिंग लॅब २४ सप्टेंबर २०२० ला सुरू झाली. ही लॅब उशिरा सुरू होऊन पण अल्पावधीतच धडाकेबाज कामगिरी करत गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल एक लाख नमुने तपासणीचा पल्ला गाठला आहे. 

लाच स्वीकारताना वितरण अभियंता जाळ्यात; अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोची देऊळगाव राजात कारवाई

जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांची स्वॅब नमुने पूर्वी तपासणीसाठी अकोला, अमरावती, यवतमाळ तर कधी नागपूर येथे पाठवावे लागत होते. तेथून त्यांची तपासणी अहवाल येण्यास पाच दिवसांचा वेळ लागत होता .आता जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या स्वॅब, नमुने जिल्ह्यातच तपासणी होत असल्याने अहवाल लवकर प्राप्त होत आहे. कोरोनाच्या रोग्याला योग्य वेळी उपचार घ्यायला खूप मदत होत आहे. या कोरोना योद्धावर नमुने तपासणीची जबाबदारी आहे.

यामध्ये येथील नोडल ऑफिसर डॉ. प्रशांत पाटील, प्रभारी अधिकारी डॉ.पल्लवी वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयसिंग राजपूत, डॉ. समर खान, डॉ. हीदायत खान, डॉ.शीतल सोळंके, अविनाश हिवाळे, सोपान शिंदे, प्रवीण वाकोडे, श्रद्धा लांडगे, चेतन एकडे, वैभव तावरे, ज्ञानेश्वर खांडेभराड, शीतल इंगळे, अशोक मुंडे, वैभव जाधव, नीलेश इंगोले, दीपक सुसर, गजानन बोरखडे, भारत सुरडकर, शेख जहीर, शेख सलमान, शेख वसीम, प्रवीण चव्हाण, प्रतीक सालोख, प्रथमेश शिरसाट, मनीषा गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय राजपूत हे कोविड- १९ आरटीपीसीआर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यान्वित आहेत. त्यांना प्रत्येक अहवालाची पुष्टी करावी लागते, त्यांच्या आतापर्यंत एक लाख अहवालांमध्ये एकही चूक नाही. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यदक्षतेची सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या सर्व कार्यात त्यांना रिपोर्टिंग टीममध्ये अमित किन्हीकर, अमोल साळोख, गजानन भोरखळे, महेश महेत्रे, सचिन राठोड आदी व सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे सर्वांचे हे यश आहे. 

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे.  पेशंटला लवकरात लवकर रिपोर्ट जाऊन ट्रीटमेंट सुरू होत असल्यामुळे कामाचा फार अभिमान वाटतोय. बुलडाण्यातील कोरोनाचे संकट लवकरच कमी होवो सर्व पेशंट यातून सुखरूप बाहेर येवो. 
- डॉ. अजय राजपूत, बुलडाणा
 

loading image
go to top