
बुलडाणा : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, बुलडाणा अंतर्गत कार्यरत वायुवेग पथकाने चालू वर्षातील जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत बेकायदेशीर खनिज वाहतूक करणाऱ्या आणि विना नंबर प्लेट टिप्पर वाहनांवर धडक कारवाई केली आहे. या कालावधीत एकूण ८३५ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ३३९ विना नंबर टिप्पर वाहनांवर कारवाई करत ३५ लाखावरुन जास्त दंड वसूल करीत अवैध गौणखनिज वाहतुकीला लगाम लावली आहे.