अकोला : जि.प. कृषी सभापतींच्या कारचा अपघात, चालकाचे अपहरण

एका महिलेने अपहरण केल्याचा आरोप, पोलिसात तक्रार
crime news Akola Zilla Parishad Agriculture Speaker car accident driver kidnapped
crime news Akola Zilla Parishad Agriculture Speaker car accident driver kidnapped esakal

अकोला: जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या शासकीय वाहनाचा सोमवारी दुपारी वाशिम बायपास रोडवर अपघात झाला. भरधाव एका आल्टो कारने त्यांच्या शासकीय वाहनाला जोरदार धडक दिली. यात झालेल्या वादात कारचालकाचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणात जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ हे काही कामानिमित्त शासकीय वाहनाने जात असताना, समोरून भरधाव येणाऱ्या एमएच २८ बीके १२८२ क्रमांकाच्या आल्टो कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे वाद झाला. चालक असलेल्या एका महिलेने शासकीय वाहनाचे चालक पंजाबराव तालोट यांचे अपहरण करून खामगावला नेल्याचा आणि नुकसानभरपाई मागितल्याचा आरोप जि.प. सभापती वडाळ यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणात जुने शहर पाेलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या प्रकरणात जुने शहर पाेलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com