तिने पाण्या साठी विचारले अन् त्याने काढली छेड

त्या आंबट शोकीन ब्रोकर च्या घरी धडकल्या रणरागिनी
crime news molestation She asked for water Deulgaon Raja akola
crime news molestation She asked for water Deulgaon Raja akolasakal
Updated on

देऊळगाव राजा : काका पाणी देऊ का, असे विचारून तांब्या भरून पाणी पाजणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा घृणास्पद प्रकार शहरातील त्र्यंबक नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी घडला, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सदर अघोरी कृत्यामुळे परिसरातील संतप्त महिला त्या आंबट शोकीन ब्रोकर च्या घरी धडकल्या मात्र त्याने पळ काढला. विक्री असलेला प्लॉट पाहण्याच्या बहाण्याने तो त्र्यंबक नगर परिसरातील एका घरासमोर थांबला होता, घरासमोर उभे असलेले काका बर्‍याच वेळपासून उन्हात उभे असल्याचे पाहून निरागस मुलीच्या मायेला पाझर फुटला आणि त्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने प्लॉटिंग विक्री करणाऱ्या सदर व्यक्तीस माणुसकी म्हणून पाण्याचे विचारले.

ती पाणी घेऊन आली तांब्याभर पाणी पिल्यानंतर तो ब्रोकर घरात शिरला आणि त्याने तिची छेड काढली.अचानक घडलेल्या सदर प्रकाराने ती भांबावून गेली, आणि तिने आरडाओरड केली. आपण केलेली चुक लक्षात येताच त्याला युक्ती सुचली अन् त्याने लगेच त्या अल्पवयीन मुलीच्या वडीलास फोन केला व मी तुमच्या घरी आलो होतो. घरी कोणीच नव्हतं मी तुमच्या मुलीस पाणी मगितलेव्ही तिच्या शिक्षणाबद्दल विचारपूस करून डोक्यावर हात ठेवला आणि ती खूप घाबरली अशा प्रकारची सारासराव करून तिथून पळ काढला. सदर प्रकार शेजारी महिलांना कळाल्यावर सदर मुलीने घडलेला प्रकार महिलांना सांगितला. त्यावेळी माणुसकी म्हणून पाण्यासाठी विचारले असता ५३ वर्षीय त्या आंबट शोकीना ने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याच्या या प्रकाराने महिला संतप्त झाल्या.

लगेच रणरागिणींचा मोर्चा गिरोली बुद्रुक मार्गावर असलेल्या त्या ब्रोकरच्या घरावर धडकला, आणि त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला, परिसरातील नागरिकां कडुन घडलेल्या प्रकाराबद्दल विचारपूस सुरू असताना पोलिसांची व्हॅन दाखल झाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर व्यक्तीच्या पत्नीस विचारपूस केली असता तो अकोला येथे कामानिमित्त केला असल्याचे तिने सांगितले. तदनंतर पीडित मुलीच्या आईसह अनेक महिला पोलीस ठाण्यात सदर प्रकाराबद्दल तक्रार देण्यासाठी गेल्या, फिर्याद देण्याचे काम सुरू असताना मुलीचे वडील पोलिस ठाण्यात आले व त्यांनी बदनामीच्या भीतीने फिर्याद नोंदविली नाही. वडिलांच्या व यापेक्षाही जास्त वय असलेल्या व्यक्ती कडून घडलेल्या सदर अमानवीय कृत्या बाबत समाजमना कडून संतप्त भावना व्यक्त होत असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रवृत्तीला शिक्षा व्हायला पाहिजे अशा भावना समाजाच्या सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Akola City Bus
Balapur Soybean Crop
MLA Randhir Savarkar discusses the restructuring of the Agriculture Department with officials at the Agriculture Minister’s office.
MSEDCL deputy executive engineer caught in ACB bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com