चोरीचे सोने खरेदी प्रकरण ; सराफा व्यापाऱ्यास अटक

जालना येथील रुक्मिणी गार्डन जवळ एका घरात २२ मे रोजी चोरी झाली होती सदर चोरीत चोरट्यांनी ४१ लाखांचे सोने चोरून नेले होते...
crime news Stolen gold purchase case gold trader arrested  Deulgaon Raja  Buldhana
crime news Stolen gold purchase case gold trader arrested Deulgaon Raja Buldhanasakal

देऊळगाव राजा : चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी शहरातील पद्मावती ज्वेलर्स च्या मालकाला जालना पोलीस अधीक्षक यांच्या एलसीबी पथकाने अटक केली, दरम्यान सदर ज्वेलर्स कडून चोरट्याने विकलेले १८ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले तर पोलिसांनी ज्वेलर्सला अटक केल्याने शहरातील सराफा असोसिएशन मध्ये खळबळ उडाली आहे. जालना येथील रुक्मिणी गार्डन जवळ एका घरात २२ मे रोजी चोरी झाली होती सदर चोरीत चोरट्यांनी ४१ लाखांचे सोने चोरून नेले होते, जालना पोलिसांनी पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा यांच्या मार्गदर्शनात तातडीने तपास करून राजू श्यामराव सुराशे वय ४८ हल्ली मुक्काम देऊळगावराजा यास अटक केली होती.

त्याचा पीसीआर घेऊन पोलिसांनी तपास केला असता चोरट्याने जालना येथे जमिनीत पुरून ठेवलेले साडेसात तोळे सोने काढून दिले व उर्वरित सोने देऊळगाव राजा येथील पद्मावती ज्वेलर्स कडे विकल्याची कबुली दिली.दरम्यान २४ मे रोजी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देऊळगा राजा येथे दाखल झाले ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात तपासासाठी पद्मावती ज्वेलर्सचे मालक यांना ताब्यात घेण्यात आले तपासाअंती त्याच्याकडून चोरितील खरेदी केलेले अठरा तोळे सोने जप्त करण्यात आले या प्रकरणात चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी देऊळगाव राजा येथील पद्मावती ज्वेलर्सचे मालक सुजित भाउलाल सावजी वय ४१ यास अटक करण्यात आली, सदर कारवाई पूर्वी शहरातील सराफा व्यापार्‍यांनी पोलीस ठाणे गाठले.

आपले सहकारी सराफा व्यापाऱ्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपी ज्वेलर्स याने १८ तोळे सोने घेतल्याची कबुली दिली यापूर्वी ही सदर सराफा व्यावसायिकावर चोरीचे सोने घेतल्यास संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत असे असताना सराफा व्यापारी यांच्याकडून गैर कृत्याचे पाठराखण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com