Businessman Protest: अकोला येथील व्यापारी रघुनाथ अरबट यांच्यावर मावसभावाने तब्बल ३२ लाख रुपयांची फसवणूक केली. न्याय मिळवण्यासाठी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. या प्रकरणामुळे व्यापारी समाजात संताप निर्माण झाला असून व्यापारी संघटनांकडून कारवाईची मागणी जोर धरत आहे.
अकोला : अकोल्यातील बिल्डिंग मटेरियल व्यापारी रघुनाथ अरबट यांच्यासोबत त्यांच्या मावस भावाने तब्बल ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती.