esakal | दुर्मिळ पान पिंपरी, पानमळा नष्ट होण्याच्या मार्गावर!
sakal

बोलून बातमी शोधा

The crop is on the verge of extinction due to the continuous outbreak of certain diseases on the rare leaf Pimpri and leaf garden in Panaj.jpg

अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे औषधी वनस्पती म्हणून पान पिंपरी या पिकाला संपूर्ण देशात मोठी मागणी आहे. या भागात मोठ्या संख्येने वस्ती करून राहत असलेल्या बारी समाजाचे हे पारंपारिक पीक असून या भागातील मोठ्या संख्येने मजूर वर्गाची उपजीविका देखील याच पिकावर अवलंबून आहे.

दुर्मिळ पान पिंपरी, पानमळा नष्ट होण्याच्या मार्गावर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पणज (अकोला) : परिसरातील दुर्मिळ पान पिंपरी व पान मळ्यावर सतत विशिष्ट रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सदर पिक नष्ट होण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी पानमळा, पान पिंपरी उत्पादक आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, शिरजगाव या भागात तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट, उमरा, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड तसेच बुलढाणा जिल्हा व जळगाव जामोद तालुक्यात पान मळ्याची शेती करण्यात येते. अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे औषधी वनस्पती म्हणून पान पिंपरी या पिकाला संपूर्ण देशात मोठी मागणी आहे. या भागात मोठ्या संख्येने वस्ती करून राहत असलेल्या बारी समाजाचे हे पारंपारिक पीक असून या भागातील मोठ्या संख्येने मजूर वर्गाची उपजीविका देखील याच पिकावर अवलंबून आहे.

गत काही वर्षांपासून या पिकाच्या उत्पादनाकरिता येणारा मोठा खर्च, गारपीट, वादळी वारे, कमी व जास्त तापमान यासारख्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सदर पिकाचे उत्पादन घटत चालले आहे. कृषी विभाग व कृषी विद्यापीठ सुद्धा शेतकऱ्यांना पिकासंदर्भात योग्य मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे पान पिंपरी व पानमळा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. याच्या परिणाम म्हणून मागील वर्षात पिंपरी उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रमाण जास्त आहे.

त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी हरी नारायण माकोडे नगराध्यक्ष अकोट, गजानन अकोटकर, संजय बोडके, रमेश आकोटकर, योगेश नाठे, गजानन ध्रमे, सुनील रंदे, दीपक अस्वार, अनंता मिसाळ, दिवाकर भगत, गोपाल हागे, रमेश अस्वार, महादेव आव्हाडकार, रमेश हेंद, गौरव निचळ, विजय ताटे, वसंतराव येऊल यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

पानमळा व पान पिंपरी उत्पादक शेतकऱ्यांनी नुकतेच पालक मंत्री, खासदार, आमदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देवून त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

- पानमळा व पानपिंपरी पिकाल विम्याचे संरक्षण लागू करण्यात यावे.
- पिकास देय असलेल्या अनुदानाच्या वितरणातील किचकट प्रक्रिया व जाचक अटी रद्द करण्यात याव्या.
- पिकाची साठवणूक, वाळवणी, प्रतवारी, पॅकेजिंग इत्यादीसाठी अंजनगाव सुर्जी, अकोट, अचलपूर, चांदूर बाजार, जळगाव जामोद या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या.
- पिकाची कृषी विभागाकडून जीवो टॉकिंग करण्यात यावी.
- डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठामार्फत मौजे देवठाणा तालुका अकोट येथे उभारण्यात आलेल्या पानवेली संशोधन केंद्र निष्क्रिय अवस्थेत आहे. सदर केंद्रास पुरेसा व आर्थिक निधी उपलब्ध द्यावा.


संपादन - सुस्मिता वडतिले