

Illegal Cattle Transport for Slaughter Busted in Chikhal
Sakal
चिखली : गोवंश जनावरांची क्रूरपणे व कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळीवर चिखली पोलिसांनी मोठी कारवाई करत ५६ बैलांची सुटका केली, तर दोन आयशर वाहने आणि सुमारे ३१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून ही कारवाई २२ जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बुलडाणा-जालना रोडवरील शहरातील दांडगे ले-आऊट समोर करण्यात आली.