esakal | नियम तोडून विक्रेते रस्त्यावर; पोलिस, मनपा प्रशासनाची वाढली डोकेदुखी

बोलून बातमी शोधा

नियम तोडून विक्रेते रस्त्यावर; पोलिस, मनपा प्रशासनाची वाढली डोकेदुखी
नियम तोडून विक्रेते रस्त्यावर; पोलिस, मनपा प्रशासनाची वाढली डोकेदुखी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता आठवडाभरापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाही. नियम तोडून विक्रेते रस्त्यावर हातगाड्या लावून फिरत आहे. संचारबंदीला खो देत विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी आठवडाभरानंतर सोमवारीही कायम असल्याने पोलिस व महानगरपालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

अकोला जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची भरही पडत असल्याने आता अकोल्यातील आरोग्य यंत्रणा कमी पडताना दिसत आहे. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव होत नसल्याने मृत्यूची संख्याही वाढत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून गर्दी राेखण्यासाठी जिल्हा प्रशसानाने कठाेर निर्बंध लागू केले. त्याला नागरिकांनी खो देत थेट रस्ते, बाजारात गर्दी सुरू केली आहे.

त्यामुळे भाजीपाला- फळ खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत महापािलकेने बदल केले, जागाही बदलली. मात्र या आदेशाचे पालन कुठेच होताना दिसत नाही. व्यावसाियक व नागरिकांना फिजिकल डिस्‍टन्सिंगचे पालन, चेहऱ्यावर मास्‍क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असल्या तरी त्याचे पालन होताना दिसत नाही. साेमवारी किरकोळ भाजीपाला, फळ विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी हातगाड्यांवरच आपली दुकाने थाटली हाेती. याठिकाणी पाेलिस येताच इंदाेर गल्ली, जनता बाजारात जाणाऱ्या गल्लीत हातगाड्या घेऊन व्यावसाियक जात हाेते. पाेलिस जाताच ते पुन्हा रस्त्यावर येत हाेते. ही लपंडाव दिवसभर सुरू होता. जठारपेठ चौकातही रस्त्यावरच भीजी विक्रीची दुकाने थाटली होती.

...................

पोलिस गस्त वाढवण्याची गरज

शहरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची दिवसाही गस्त वाढवण्याची गरज आहे. पोलिसांचा वचक राहिला नसल्याने कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांसोबतच विनाकारण फिरणारे नागरिकही गर्दी करीत आहे. त्यामुळे यंत्रणांवरील ताण वाढत आहे. गस्त घालणाऱ्या पोलिस पथकांची संख्या वाढवल्यास विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांमध्ये धाक निर्माण होऊ शकेल.

...........................

आयुक्त थेट रस्त्यावर

महानगरपालिका आयुक्तांनी ता. १६ एप्रिल रोजी आदेश काढून भाजी व फळ विक्रेत्यांबाबत नियमावली जाहीर केली. त्यानंतरही जनता भाजी बाजार व शहरातील इतर ठिकाणी भाजी बाजारात होणारी गर्दी कायम होती. विक्रेतेही थेट रस्त्यावर आले होते. त्यामुळे सोमवारी आयुक्तांनी जठारपेठ परिसरातील भाजीबाजाराची पाहणी केली. यावेळी रस्त्यावर हातगाडी लावून भाजी विक्रे करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

संपादन - विवेक मेतकर