Akot | शहरात संचारबंदी; परिस्थिती नियंत्रणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोट शहरात संचारबंदी; परिस्थिती नियंत्रणात
अकोट शहरात संचारबंदी; परिस्थिती नियंत्रणात

अकोट शहरात संचारबंदी; परिस्थिती नियंत्रणात

अकोट : अकोट शहरातील हनुमान नगर परिसरात उद्‍भवलेल्या दगडफेकीनंतर रविवारी संपूर्ण अकोट शहरात चोवीस तास संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान, शहरात आज सकाळपासून सर्वत्र शुकशुकाट पसरलेला होता. शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून, दिवसभऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दगडफेक करणाऱ्या १० आरोपींना अटक करण्यात आली असून, या भागात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोट शहरातील हनुमान नगर परिसरात दुपारी २.३० ते ३ वाजता दरम्यान काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. यानंतर हनुमान नगर परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दगडफेक करणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध १४३, १४७, १४८, ३३६, ४२७, २९४, ५०६ अशा विविध कलमान्वये शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. आज, ता.१४ नोव्हेंबर रोजी १० आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत सध्या अकोट शहरात तळ ठोकून असून, शहरात आज दिवसभर कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. आज अकोट शहरात शांतता समितीची बैठक पोली स्टेशनच्या परिसरात आयोजित करण्यात आली होती. सर्वांनी अकोट शहरात शांतता प्रस्थापित करण्यात प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

loading image
go to top