अकाेला : अंतिम प्रभाग रचनेची उत्सुकता शिगेला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Curiosity about formation of Final ward structure municipal elections akola

अकाेला : अंतिम प्रभाग रचनेची उत्सुकता शिगेला!

अकाेला : महानगरपालिका निवडणुकीचे पडघम प्रभाग रचनेच्या कार्यक्रम जाहीर होण्यासोबतच वाजू लागले आहेत. इच्छुकांमध्ये अंतिम प्रभाग रचनेबाबत उत्सुकता असून, त्यासाठी १७ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यापूर्वीच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या तयारीची लगबग सुरू झाल्याचे बघावयास मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्‍च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार निवडणूक आयोगाने मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

प्रभाग रचनेबाबत राज्य निवडणूक आयाेगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी मनपा आयुक्तांच्या नावे आदेश जारी केला आहे. यातुसार १२ मेपर्यंत प्रभाग रचनेला अंतिम प्रस्तावास मान्यतेसाठी निवडणूक आयुक्तांना सादर करणे आणि १७ मे राेजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करावी लागणार आहे.

पावसाळ्यात निवडणूक कशी घेणार?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक आयोगातर्फे प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणुकीची पुढील प्रक्रियाही सुरू होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, ७ जूनपासून पावसाळा सुरू होत आहे. त्यापूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मनपा क्षेत्रात पावसाळ्यामध्ये निवडणुकीची तयारी कशी होईल, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

...तर सप्‍टेंबर उजाडेल!

निवडणूक आयोगाने अकोला मनपासह राज्यभरातील महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम किमान दीड महिना चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान हे सप्टेंबरमध्येच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

३० प्रभाग, ९१ सदस्य

अकोला महानगरपालिकेने नव्याने तयार करून आयोगाकडे सादर केलेल्या अहवालानुसार मनपाची निवडणूक ३० प्रभागात होणार असून, त्यातून ९१ सदस्य निवडून दिले जाईल. प्रभार रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर प्रभागांच्या अंतिम रचनेबाबत उत्सुकता होता. मात्र, आयोगाने जाहीर केला कार्यक्रम बघता अकोला महानगरपालिका क्षेत्रातील आयोगाने यापूर्वी निश्चित केलेल्या प्रभागांच्या सीमांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

उमेदवार निवडीसाठी आरक्षणाची प्रतीक्षा

प्रभाग रचना अंतिम करताना यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सीमांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे राजकीय पक्षांकडून भौगोलिक रचनेनुसार संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाले असले तरी अनुसुचित जाती व जमातीसोबत महिला आरक्षणानुसारच उमेदवार निश्चित होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना प्रभाग आरक्षणाबाबतची प्रतीक्षा आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचना असल्याने ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या नुसार प्रभागांचे आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Curiosity About Formation Of Final Ward Structure Municipal Elections Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top