कोविडच्या काळात सायबरने पार पाडली पडद्यामागून भूमिका

भगवान वानखेडे 
Wednesday, 22 July 2020

जिल्ह्यातील 217 जणांना शोधून काढण्यात केली मदत 

अकोला  ः कोरोनाची दहशत आणि समाजात आपण बाधित झालो याची दहशत घेऊन अनेक बाधित रुग्ण लपून बसलेले होते. हळूहळू हे प्रमाण जरी कमी होत असले तरी आतापर्यंत अशा लपून बसलेल्या कोरोना बाधिताना शोधून काढून त्यांना रुग्णालयापर्यंत नेऊन पोहचविण्यात इतर यंत्रणेप्रमाणे सायबर विभागाचीही महत्वपूर्ण भूमिका राहली आहे. हे काम सायबरने पडद्यामागून जरी केले असले तरी यातून रुग्ण शोधून कोरोनाचे संक्रमण कमी करण्यास मदत झाली आहे. 

फेब्रुवारी-मार्च महिन्यांत विदेशातून आलेल्यांना अलगीकरण कक्षात ठेवले जात होते. काही सुज्ञ नागरिक जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला सहकार्यही करीत होते. असे जरी असले तरी काही नागरिक मात्र, भीतीपोटी लपून बसत असल्याचे दिसून आले होते. अशा नागरिकांना ट्रेस करून त्याना रुग्णालयापर्यंत पोहचिवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस विभागाला अथक परिश्रम घ्यावे लागले आहेत. या यंत्रणेला पडद्यामागून मदत केली ती सायबर विभागाने. सायबर विभागाने आतापर्यंत 217 जणांना शोधून रुग्णालपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. 

भितीपोटी मोबाइल करीत असत बंद
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील  217 लोकांचे संपर्क करण्यामध्ये मदत केली.  पाॅझिटिव्ह आणि त्यांच्या संपर्कात आलेले इतर अशी ही संख्या आहे. हे काम  पोलिस अधीक्षक, नगरपालिकेच्या आदेशानुसार पार पाडण्यात आले आहे. अशा रुग्णाना शोधतांना अडचणी येत असत. काही बाधित रुग्ण मोबाइल बंद करून ठेवत असत अशांना शोधण्यासाठी खूप अडचणी आल्याच्या सांगण्यात आल्या आहेत. 

काही असे बाधित रुग्ण होते की, त्यातील 10 ते 12 रुग्णांना जणांना शोधून दिले. काही लोकांनी मोबाइल बंद केला होता. मात्र, पोलिस प्रशासनाला दिलेल्या डायरेक्शननुसार त्यांनाही शोधून काढले आहे. आता हे प्रमाण कमी होत आहे. 
-शैलेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर विभाग, अकोला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber ​​played a behind-the-scenes role during Kovid's time