
ॲप डाऊनलोड करताच पेंशन खात्यातून ५९ हजार काढले
अकोला :ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिकही आलेल्या मॅसेजला आणि कॉलला उत्तर देऊन बळी पडत आहेत. अशीच घटना रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पेंशनधारक महिलेला एक मॅसेज आला. तुमचे सीम कार्ड बंद होणार आहे. तुम्ही हे ॲप डाऊललोड करा, असे केल्यानंतर महिलेच्या खात्यातून ५९ हजार रुपये परस्पर काढण्यात आले. रामदासपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेजा मंगेश फडणीस (वय ६२ रा. भागवत प्लाट) यांना ता. ३० मार्च रोजी त्यांच्या मोबाइलवर सीम कार्ड ब्लॉक होईल, असा मॅसेज आला. तेव्हा मॅसेजमधील कस्टमर केअर नंबरवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पेटीएम, क्वीक सपोर्ट व बीएसएनएल एनी डेस्क हे डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या एसीबीआयच्या पेंशन खात्यातून ५९ हजार रुपये काढून फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी बँक स्टेटमेंट तपासले असता त्यांना ६.१८ ते ६.२६ वाजता दरम्यान रक्कम काढल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Cyber Crime Update 59000 Withdrawn From Pension Account While Downloading App Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..