
अकोला : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शहरातील एका डॉक्टरची तब्बल ६४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिव्हील लाईन पोलिसांनी गुजरात येथून दोन आरोपींना अटक केली आहे. सायबर सेल व सिव्हील लाईन पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून, न्यायालयाने आरोपींना १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.