पावसामुळे २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to crops on 2 thousand hectares due to rain

पावसामुळे २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अकोला - जिल्ह्यात १ जून ते १४ जुलैपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २ हजार १४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. त्यासोबतच ४७ घरांचेही नुकसान झाले. सात जनावरांचाही पावसाळी स्थितीमुळे मृत्यू झाला. तसेच गत दाेन दिवसात बाळापूर तालुक्यातील ७७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

जिल्ह्यात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येत असून ते दुथडी भरून वाहत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जाेर धरला असून, काही भागात अतिवृष्टी हाेत आहे. त्यातच अकोला व बाळापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी व नाल्याच्या काठी वस्ती असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले.

नाल्यांचे पाणी शेतातही शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यासंबंधिच्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी व महसूल विभागामार्फत करण्यात येत आहे. अंतिम सर्वेक्षण झाल्यानंतर संबंधितांना नुकसान भरपाई मिळेल.

असे झाले नुकसान

  • बाळापूर व अकाेला तालुक्यात २७ जून राेजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली. एकूण १ हजार २६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यात ८५० हेक्टर क्षेत्रावरील आणि बाळापूर तालुक्यात ४२५ हेक्टर आर. क्षेत्रावरील पिकांची हानी झाली हाेती.

  • ७ जुलै राेजी पावसामुळे याच दाेन तालुक्यातील ८६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली. बाळापूर तालुक्यात १३ व १४ जुलै राेजी झालेल्या पावसाचा ७७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला.

Web Title: Damage To Crops On 2 Thousand Hectares Due To Rain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..