esakal | राखी पौर्णिमेला ‘स्वीट पॉयझन’चा धोका!; बाजारातील मिठाईत...
sakal

बोलून बातमी शोधा

sweet and rakhi akola.jpg

‘रक्षाबंधन’ हा बहिण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावचे हृदय प्रेमाणे जिंकून घेते. त्यानंतर भावाला ओवाळत त्याचे तोंड मिठाईने गोड करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सध्या बाजारात विविध प्रकारच्या राख्यांसह मिठाया सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. परंतु ही मिठाई भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळाईच्या रुपाने घराघरात ‘स्वीट पॉयझन’ पोहचण्याचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे. 

राखी पौर्णिमेला ‘स्वीट पॉयझन’चा धोका!; बाजारातील मिठाईत...

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : ‘रक्षाबंधन’ हा बहिण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावचे हृदय प्रेमाणे जिंकून घेते. त्यानंतर भावाला ओवाळत त्याचे तोंड मिठाईने गोड करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सध्या बाजारात विविध प्रकारच्या राख्यांसह मिठाया सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. परंतु ही मिठाई भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळाईच्या रुपाने घराघरात ‘स्वीट पॉयझन’ पोहचण्याचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे. 

राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा सण प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. यंदा राखी पौर्णिमा ही सोमवारी (ता. 3) साजरी केली जाणार आहे. भाऊ-बहिणीचा पवित्र नात्याला समर्पित या सणाला बहिण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचं आणि रक्षणाचं प्रतिक अशी राखी बांधते. भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहिण मागणं मागते आणि एकमेकांना गिफ्ट देऊन सणाचा आनंद द्विगुणीत होतो.

भाऊ-बहिणीच्या पवित्र सणाला बहिण भावाचे तोंड मिठाईने गोड करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शहरातील दुकानात चमचमीत विविध प्रकारची रंग बेरंगी मिठाई उपलब्ध झाली आहे. सदर मिठाई स्वस्त असून आकर्षण पॅकिंगमध्ये असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. परंतु बाजारात असलेली ही मिठाई शुद्ध खव्यापासुनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ग्राहकांनीही मिठाई खरेदी करताना त्याचा दर्जा तपासूनच पाहण्याची आवश्यकता आहे. 

अशी ओळखा मिठाईतील भेसळ

  • मिठाईवर चांदीच्या वर्खाच्या नावाने अ‍ॅल्युमिनियम फ्वॉइल वापरले जाते. त्याची ओळख पटण्यासाठी चांदीचा अर्क जाळा. खरा चांदीचा अर्क जाळल्यास तो लहानशा बॉल प्रमाणे दिसेल तर अ‍ॅल्युमिनियम फ्वॉइल करडा रंगाचे होईल. वर्खाचा नमुना कोमट पाण्यात टाकल्यानंतर त्यावर डायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे थेंब टाका. मिश्रणात हायड्रोजनचे बुडबुडे आले तर भेसळ आहे. 
  • मिठाईमध्ये  कृत्रिम रंग मेटॅनिल यलो वापरला जातो. त्याची ओखळ पटण्यासाठी मिठाईच्या तुकड्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे काही थेंब टाका. मिठाईला जांभळा रंग आल्यास कृत्रिम रंग आहे. तसेच मिठाई हातात घेतल्यानंतर हाताला जर रंग लागत असेल त्यात भेसळ आहे. 
  • खव्यामध्ये स्टार्च मिसळले जाते. हे ओळखण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये थोडासा खवा घ्या व त्यात पाणी मिसळा. ते थोडे गरम करा. खवा गार झाल्यावर त्यात पाच थेंब आयोडिन टाका. जर खव्याचा रंग जांभळा झाला तर त्यात स्टार्च आहे.